Powered By Blogger

Search This Blog

Wednesday, November 21, 2012

आज प्रथमच मला जरा धसका बसला... 22 Nov 2012

 आज बर्याच दिवसांनी ब्लॉग लिहितोय कारण बरेच दिवस कामात होतो... वेळ मिळत नव्हता.... आणि आज लिहिण्यास कारणच असे घडले आहे.....
 
आज प्रथमच मला जरा धसका बसला... काय नाही घराचे माझ्या लग्नाचा विचार करत आहेत आणि युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत....

मावशीचा सकाळी सकाळी फोन "रोहितला पण  बघायला यायला सांग म्हणून "

आजच्या आज मुलगी बघायला जायचे आहे असा आऊसाहेबाचे फर्मान आले....
पण मी साफ धुडकाऊन लावले....
मी सांगितले तुमचे तुम्ही पहिला बघून या मुलगी मग बघू  पुढचे पुढे....
तरीपण काय ऐकायला तयार नाहीत ... मला ओफीस मधून थोडा वेळ काढून ये म्हणत होत्या... पण मी साफ इन्कार केलाय.... बघू काय होतंय...



 

Monday, September 17, 2012

Ganpati bappa comming .... 17 sept 12

Today aftet office when reached at home .. Then found that whole family is bz in decoration.... Then am also paricipated in it... Anup, Saurabh, me and my sister finally complete the decoration.... But something still missing... What was that?????

Hey that is Ganpati Bappa....
Egerly waiting for him.... May Bappa resolve all our troubles...


Prince of persia the forgotten sands - Part 6

प्रिन्स सिहासन कक्षात आला आहे .तो काहीतरी करून पुढचा मार्ग शोधतोच. त्या सिंहासनाच्या खाली एक भुयारी मार्ग असतो. कसाबसा ते त्याला शोधण्यात यश येते आणि तो खाली जातो .






खाली पोचल्यावर त्याच्यावर उडते किडे हमाला करतात.

त्याना एकावर एक मारत पुढे जात राहतो. जिथे जिथे तो अडकतो तिथे तिथे रझिया त्याच्या मदतीला धाऊन येते.


पुढे जाता जाता त्याला गोलाकार पायर्या दिसतात. तो त्यावरून खाली जाऊ लागतो.

पुढे गेल्यावर त्याला रझिया भेटते. ती प्रिन्सला सांगते कि रताशला मारण्यासाठी जी तलवार हवी आहे ती सुलेमान राजाच्या पुतळ्याचा मागे आहे.


 असे सांगता सांगता ती गायब होते. प्रिन्सला कळते कि हि गायब झाली म्हणजे काहीतरी संकट येणार आहे तोच तिथे विशाल राक्षस येतो.

प्रिन्स त्याला बर्याच कडव्या झुंजीनंतर पाछाडतो.




या दरवाजाच्या आत ती तलवार आहे पण ती मिळवण्यासाठी तो सुलेमान राजाचा पुतळ्याचे तोंड दरवाजाकडे करायचे असते. त्याचासमोर एक चक्र असते ते फिरवल्यावर तो पुतळा हालू लागतो.
 आणि ते चक्र व्यवस्थित रीतीने फिरवून पुतळ्याचे तोंड  दरवाजाकडे करण्यास प्रिन्सला यश येते.


त्यामुळे दरवाजा उघडतो आणि प्रिन्स त्या खोलीमध्ये शिरतो . तिथे त्याला ती तलवार दिसते.







प्रिन्स ती तलवार घेतो आणि पुढे जात असताना त्याला पाण्याचा दरवाजा दिसतो आणि तो त्यात शिरतो.

तिथे रझिया त्याला भेटते. ती म्हणते हि तलवार खास जीनला मारण्यासाठीच बनवलेली आहे. आपण दोघे मिळून आता शत्रूशी मुकाबला करू. त्या तलवारीवर रझिया मंत्र उच्चार करते आणि तलवार खाली पडते व रझिया गायब होते.



त्या तलवारीतून राझीयाचा आवाज येतो. मी ठीक आहे. मी या तालवारीचाच एक हिस्सा आहे. यामुळे तुला रताशला मारायला मदत मिळेल. प्रिन्स ती तलवार उचलतो आणि बाहेर पडतो. पुढे गेल्यावर प्रिन्स महालात प्रवेश करतो. तिथे पोचल्यावर त्याला वाळूचे तीन राक्षस त्रीकोणाकृती उभारलेले दिसतात.

 काय करत असतात ते?????

 

Finally ganpati bappa booked

On Sunday finaly got time to book ganpati bappa. Buy a thermocol decoration also. Previous year cant got this type of statie of Ganpati bappa. But this year I visited the shop many times and finally booked it.... :)

Sunday, September 16, 2012

Prince of persia the forgotten sands - Part 5

प्रिन्सला आता काही मार्ग सापडत नाही.... कुठे जायचे हेच त्याला समाजत नसते . तोवर त्याच्यासमोर गिधाडे जमा होतात .



प्रिन्स क्षणाचाही विचार न करता त्याच्यावर झेप घेतो आणि त्या गीधाडाच्या अंगावरून उडी मारून पुढे उडी  मारतो . पुढे पोचल्यावर खाली त्याला मलिक सांगाड्याना  मारताना त्याला दिसतो .

 पण जेव्हा मलिक त्या सगळ्या सांगाड्याना खल्लास करतो तेव्हा त्याचे रुपांतर रताश मध्ये व्हायला चालू होते .



 मलिक आता रताश राक्षसामध्ये रुपांतरीत झालेला प्रिन्सला दिसतो. मलिक(रताश) तिथून निघून जातो .  प्रिन्स पुढे संकटाना तोंड देत देत , अवघड परिस्थितीतून स्वताःची सुटका करत करत एका ठिकाणी पोचतो .   




त्याला त्याचे २ शिपाई दिसतात .  तो एका मकबर्या जवळ आलेला असतो . तो एक गोलाकार मैदानां सारखा असतो. आणि त्याच्यावर चार भिंती उभ्या असतात.
 
पण तिथे अचानक राताश येतो.  त्या दोघांच्यात घमासान युद्ध सुरु होते .



रताशची ताकत हळू हळू कमी होऊ लागते. जेव्हा रताशला वाटते कि त्याचा शेवट जवळ आला आहे तेव्हा तो तिथून पळून जातो.

प्रिन्सला कळते कि रझियाने जे काही सांगीतालेले ते सगळे खरे होते. तो पुढे जात जात जीनच्या शहरात दाखल होतो.  तो एका ठिकाणी पोचतो जिथे बर्याच खोल गेलेल्या गोल गोल पायऱ्या दिसतात. तो त्या उतरू लागतो .

 पण अचानकपणे त्या कोसळू लागतात.
 तो कसाबसा स्वतः ला सांभाळत एका दरवाजा मध्ये घुसतो.

त्याला तिथे पाण्याचा दरवाजा दिसतो. आत गेल्यावर पुन्हा रझिया त्याला भेटते.

रझिया त्याला म्हणते रताश हा सुद्धा एक जीन आहे तो आमच्यातलाच होता. पण त्याने शैतांनी मार्ग निवडला आहे. आणि तूच यातून आमची आणि सर्वांची सुटका करू शकतोस.
प्रिन्स : यासाठी मला काय करावे लागेल.
रझिया : तू मला जीनच्या शहरात मंदिरात भेट. तु त्या शहरात स्वतहा जाऊ शकणार नाहीस मी माझ्या आठवणी तुला देते म्हणजे तुला वाट  शोधण्यास अडचण येणार नाही. असे म्हणून ती गायब होते.

प्रिन्सला मिळालेल्या शक्तीमुळे तो जुन्या काळी शहर कसे असेल ते पाहू शकत असतो आणि त्यातून वाट काढत पुढे जात राहतो.     




प्रिन्स त्या शहराच्या मंदिरात प्रवेश करतो. तिथे रझिया त्याला भेटते. त्या मंदिरात चार पुतळे असतात त्यातला एक पुतळा स्वतः राझीयाचा असतो. प्रिन्स तिला म्हणतो मी यात तुला ओळखले पण बाकीचे कोण आहेत?

रझिया : आम्ही चौघे चार जनजातीचे मुखिया होतो.आम्ही माणसांसोबत राहून एक सुखमय शहरे निर्माण करत होतो. पण आमच्यातील काहीजनाना  माणसां सोबत राहणे आवडत नसे. त्यातला एक म्हणजे रताश.




रताशने सुलेमान राजाचे साम्राज्य उध्वस्त करण्याची शपथ घेतली. त्याने आपली शक्ती वाळवंटातील वाळू  आणि वारे यांच्याबरोबर एकवटून त्याची स्वतःची फौज तयार केली. आणि सुलेमान राजाच्या साम्राज्यावर हमाला केला. त्यात जींनिचे सगळ्यां  जनजाती एकत्र आल्या पण त्याच्याशक्ती समोर जास्तवेळ टिकू शकल्या  नाहीत ... यात सगळे शहर सोडून गेले. असे म्हणता म्हणता ती गायब होते. आणि प्रिन्स समोर एक राक्षस येतो



प्रिन्स लढायला तयार होतो आणि थोड्याच वेळात त्या राक्षसाला ठार करतो आणि पुढे जाऊ लागतो.




प्रिन्स त्या शहराच्या सिहासन खोलीत येतो.



काय होईल पुढे... ??????

Thursday, September 13, 2012

Prince of persia the forgotten sands - Part 4

प्रिन्सच्या समोर त्याचा भाऊ मलिक रताश  बरोबर लढत असतो त्याच्या पर्यंत जाण्यासाठी प्रिन्सला बरेच अडथळे पार करायचे असतात. तो न डगमगता  पुढे जात राहतो .  

आणि एकदाचा त्याठिकाणी येतो जिथे मलिकचे आणि रताशचे युद्ध सुरु असते. पण त्याचवेळी  रताश मलिकला खिडकीतून बाहेर फेकतो . आता त्याचे लक्ष प्रिन्सकडे जाते .



रताशची शक्ती अफाट असते . प्रिन्स आणि रताश दोघांच्यात तुंबळ सुरु होते . प्रिन्स रताशवर एकावर एक वार करत राहतो . त्याचा प्रत्येक वार चुकवत चुकवत तो त्याला अर्धमेला करतो.





पण रताश मायावी असल्याने शक्तीचा वापर करून तिथून वर एका चबुतर्यावर जातो . 




प्रिन्स कसाबसा तिथे जातोच . पण रताश त्याच्या शक्तीने सांगाडे तयार करतो आणि ते सगळे प्रीन्सवर   हमाला चढवतात .



तो सगळ्याना खल्लास करून रताशकडे वळतो . तो आधीच अर्धमेला झालेला असतो . प्रिन्स त्याच्यावर शेवटचा वार करणार तोवर मलिक तिथे येतो . आणि रताशवर वार करतो .


पण रताश मलिकच्या शरीरात प्रवेश करतो आणि तिथून दूर कुठेतरी निघून जातो . प्रिन्सला काहीच काळत नाही त्याचा भाऊ कुठे गेला ? त्याचे काय झाले ? तो परत कुठे भेटेल ? हे सगळे प्रश्न मनात घेऊन तो पुढे जात राहतो . त्याला पाण्याचा दरवाजा दिसतो आणि तो न चुकता  त्यात जातो .

तो तिथे रझियाला भेटतो . तिला सांगत असतो त्याने ते पदक गमावले आहे . आणि तिला म्हणतो ,"मलिकबरोबर काही विचित्र झाले त्याने त्या रताशला मारले.... "

रझिया प्रिन्सला थांबवत म्हणते ,"मलिकने त्याला मारले नाही आहे. रताश ने मलिकला मारले आहे ... "
प्रिन्सला हे ऐकून धक्का बसतो . तो म्हणतो ,"कसे शक्य आहे मी माझ्या डोळ्यांनी मलिकने त्याला मारल्याचे पाहिले आहे ....."

रझिया : "रताश हा एक जीन आहे आणि तो अश्या साध्या पद्धतीने मरणारा नाही आहे . त्याला मारण्यासाठी एक तलवार आहे. तो त्यानेच मारेल.  तुझ्या भावाचा जीव अजून  रताशकडे आहे.. पण तो मरणार आहे हे निश्चित आहे ; तुला राताशला संपवण्यासाठी लागणारी तलवार जीन च्या शहरातच मिळेल . तू ती शोधून रताशला संपव ."

प्रिन्स : "मी रताशला मारणे म्हणजे स्वतःच्या भावाला मारायचे ? "
रझिया: "मला तुझ्या भावना समजतात पण हेच सत्य आहे. जर तुला मलिकचे राज्य वाचवायचे असेल, त्याच्या लोकाना वाचवायचे असेल आणि यातून बाहेर पडायचे असेल तर तुला रतशला मारावेच लागेल . "

प्रिन्स: "यातून दुसरा मार्ग असेलच ना ? " असे म्हणून तिथून बाहेर पडत असतो तोवर मागून रझिया त्याला म्हणते, "तुला पुढे मशाली दिसतील त्या मशालींच्या खाली शिडी उतरून तुला जींनीचे शहर सापडेल...... "
प्रिन्स: "मी मलिकला वाचवण्याचा मार्ग नक्कीच शोधेन.... "  असे म्हणून तो तीथू न बाहेर पडतो .

पुढे जात जात तो टेरेसवर पोचतो . पुढे वाट काढत काढत तो छतावरच्या बागेत पोचतो . पण तिथे त्याला शहराकडे एक मोठे वाळूचे वादळ येताना दिसते .


तो क्षणाचाही विलंब न करता पुढे जातो तिथे त्याला त्याचा भाऊ मलिक सांगाड्याना मारताना दिसतो .



 प्रिन्स त्याला हाक मारतो पण दूर  असल्यामुळे मलिकला आवाज जात नाही .

 

 मलिकला वेगळीच ताकत प्राप्त झालेली प्रिन्सला दिसते . त्याला मिळालेल्या शक्तीने त्यांच्या दोघा मधला पूल कोसळतो आणि मलिक पुढे जातो पण प्रिन्स तिथेच अडकतो....




 काय खरच मलिक जिवंत आहे ? प्रिन्स त्याला पुन्हा भेटेल ?