Powered By Blogger

Search This Blog

Showing posts with label #love #rohitkale #Marathi #poem #kolhapur. Show all posts
Showing posts with label #love #rohitkale #Marathi #poem #kolhapur. Show all posts

Saturday, November 22, 2014

मी जळत आहे..

मी जरी शांत असलो..
तरी आत काही जळत आहे...

माझ्या मनाची आग...
सर्व काही जाळत आहे...

पेटत आहेत सर्व दिशा..
पेटत आहे आकाश...

प्रश्नांचे काहुर माजले आहे...
सूर्य उजाडला तरी मी जागाच आहे...

मी जरी शांत असलो..
तरी आत काही जळत आहे...

रोहित काळे
22 November 2014

Monday, September 22, 2014

सामाधान

समाधान फ़क्त एवढेच आहे...
त्याच्या नावा आधी तुझ्या हातावर माझ्या नावाची मेहंदी लागली आहे...

समाधान फ़क्त एवढेच आहे...
त्याचे नाव जोडण्या आधी तुझ नाव माझ्याबरोबर जोडले गेले आहे...

समाधान फ़क्त एवढेच आहे...
त्याच्या आधी आपण आपला सुखी संसार उभा केला आहे...

समाधान फ़क्त एवढेच आहे...
त्याच्या आधी आपण मातृ पितृ सुख अनुभवले आहे...

समाधान फ़क्त एवढेच आहे...
आपण प्रेम केले आहे...
आपण प्रेम केले आहे...

वाईट फ़क्त इतकच वाटतय...
ज्यादिवाशी एकत्र आलो त्याच दिवशीच वेगळे होतोय...

रोहित काळे..
23-सप्टेम्बर-2014