Powered By Blogger

Search This Blog

Sunday, April 28, 2013

राजा आणिक राणी... 2(ओळख)


राजा आणि राणी कसे काय भेटले असतील???



राणीचे मुळगाव पुणे एका प्रतीशष्ठीत घराण्यात तिचा जन्म झालेला  आणि  राजाचे मूळगाव मुंबई, त्याची परिस्थिती तशी  चांगली नव्हती पण तितकीशी वाईटपण नव्हती. राणी  लहानपणी कधीकधी सुट्टीत मुंबईत  तीच्या मावशिकडे येत होती.

 राजा तसा लहानपणी टवाळखोरच होता. बघेल तेव्हा गल्लीत कट्ट्यावर असायचा. गल्लीत टवाळक्या करणे दिवस दिवसभर football, क्रिकेट, लपंडाव, गोट्या असे खेळ असायचेच. एकेदिवशी राणीला त्याने पाहिले आणि फिदाच झाला तिच्यावर…. पण ओळख कशी करायची? हा प्रश्नच होता.

राणी मावशीच्या शेजारी खेळायला जायची तिथे अनिकेत होता त्याला ती दादा म्हणायची आणि अनिकेतच्या बहिणीबरोबर (कोमल) रोज मुलींचे खेळ खेळत बसायची. तसा अनिकेतपण अधून मधून त्यांच्यात खेळायचा,  एकेदिवशी राजा, अनिकेतच्या घरात बोलत बसला होता. तेवढ्यात राणी तिथे  आली राणीने प्रथमच राजाला पहिले होते. कोमलआली आणि अनिकेतला म्हणाली दादा चल आपण "राजा आणि राणी" खेळू. अनिकेत हो म्हणाला आणि पुढे म्हणाला कि आत्ता आपल्याकडे राजा आणि राणी दोघेही आहेत. कोणाला काहीच कळेना. मग अनिकेत म्हणाला आग कोमल हिचे नाव राणी आणि याचे नाव राजा. हे ऐकल्यावर राजाला जरा आनंद झाला कारण त्याला तिचे नाव कळाले होते. मग कोमल म्हणाली चालेल आपण सेवक होऊ आणि हे दोघे राजा राणी असतील. त्या दिवशी राजाने खेळा खेळात राणीचा हाथ धरला होता…

खेळून झाल्यावत त्याने तो हाथ पूर्ण दिवस धुतला देखील नाही आईला त्याने जेवण  भरवायला सांगितले आणि रात्री त्या खेळाच्या आठवणीत रंगून तो झोपी गेला. बरेच दिवस त्यांचे हे खेळ चालूच राहिले. रानीपण आता राजाची खूप चांगली मैत्रीण झाली होती.
    
पण जस जसे दोघे मोठे होऊ लागले तस तसे राणीचे मावशीकडे येणे बंद होत गेले. राणी तिच्या अभ्यासात आणि राजा त्याच्या टवाळक्या करण्यात गुंग होत गेले आणि त्याना एकमेकांचा विसर पडत गेला…

आता बरीच वर्ष गेली होती राजा राणी मोठे झाले होते. राजा नोकरी करत होता आणि राणी ए Engineering  करत होति. राजा एकदा facebook कुटत बसला होता तेव्हा कोमलच्या एका पोस्ट वर राणीची comment दिसली. त्याने तिच्या profile ला भेट दिली आणि माहिती करून घेतली कि तीच राणी का ते. आणि राजाने तिला friend request पाठवली. दोन दिवस होउन गेले तरी  friend request accept नव्हती झाली. तिसर्या दिवाशी राजाला msg आला Rani accepted your friend request… मग त्याने पाहिले तर चक्क राणी online.

राजाने घाबरतच तिला hi असा msg पाठवला. तिचा reply पन आला hello असा. मग काय जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. दोघांचे रोज chatting सुरु झाले. राणीचे अभ्यासाकडे लक्ष कमी झाले आणि राजाचे कामावरचे लक्ष कमी झाले. नंतर त्यांनी एकमेकांचे mobile share  केले. मग काय Whatsapp वर दोघे २४  तास एकमेकांच्या सानिध्यात. हळू हळू ते इतके जवळ आले कि एकमेकाना msg केला नाहीतर काहीतरी चुकाल्यासारखे वाटत होते.

त्या दोघांनी भेटण्याचा plan बनवू लागले पण आता ते मोठे झालेत हे कळाले होते… तेव्हा दोघे कसे भेटायचे यावर नुसती चर्चाच करत गेले पण सगळे वायफळच ठरत होते …     

मागील भाग
             
  क्रमशः

No comments:

Post a Comment