Search This Blog

Follow by Email

Saturday, August 1, 2020

14 जुलै ते 22 जुलै ICU व 23 जुलै ते 25 जुलै

14 जुलै सकाळी अवरल्यावर नाष्टा वगैरे न करता operation साठी मला स्ट्रेचर वरून नेण्यात आले...

त्याआधी दादा महाराजांच्या फोटो ला नमस्कार केलेला आणि अंगारा आणि अत्तर पण लाउन घेतलेले.. आत फोटो नेण्यास मनाई होती...


आत गेल्यावर एक सर्जन कोल्हापूरचीच निघाली.. ती म्हणाली कोल्हापूर मध्ये डॉ. चंद्रशेखर पाटील असताना इकडे कसे? मी म्हटले त्यांच्याकडेच ट्रीटमेंट सुरू होती त्यांनी जातींदर कुमार सर्जन यांचा रेफरन्स दिलेला पण जातींदर कुमार यांनीच इकडकरा म्हणून सांगितले म्हणून इकडे आलो ते पण lockdown मध्ये...

दातातली कॅप काढून सिस्टर ला दिली.. हळू हळू procedure सुरू झाली... जांघेत injuction घुसवले युरिन साठी की काय ते नाही माहिती ... नंतर उजव्या हाताच्या मनगटात इंजेक्शनदेत होते पण त्यांना नस मिळत नव्हती म्हणून मानेवर काहीतरी करत टाके घालायला एका सर्जन ने सुरुवात केली तो पण मला काहीही न सांगता टाके देतच होता... मग मला गुंगीचे इंजेक्शन देत आहोत असे सांगितले.. यानंतर झोप लागेल... मला कधी झोप लागली कळालेच नाही.... 


मी किती वेळ operation theater मध्ये होतो मला काहीच माहिती नाही... जेव्हा जाग आली तेव्हा काहीच समाजत नव्हते माझ्या तोंडात नळ्या घातलेल्या... तहाण भरपूर लागलेली ... घसा कोरडा पडलेला.. मी पाणी पाणी म्हणायचा प्रयत्न करत होतो पण नळ्या असल्याने नुसते ओठच हलत होते.. नंतर थोड्या वेळाने कोणीतरी 2..3 थेंब पाणी दिले थोडे बरे वाटले पण तेवढे पाणी पुरेसे नव्हते.. मी पाणी पाणी करत राहिलो पण ते काही पाणी देत नव्हते..

नंतर एकदाची पाईप काढली तेव्हा कुठे जरा छान वाटले.. आणि मग पाणी पिले.. जरा जीवात जीव आला..

पहिला पहिला नुसते liquid खायला देत होते दूध, सूप, ज्युस एवढेच.. थोड्या दिवसांनी पोटातील दोन तारा ओढून काढल्या खूप दुखले... पण तारा निघाल्यावर बरं वाटलं.. 

रोज सकाळी X-Ray काधत होते.. मध्ये एकदा इको केला..

रोज विडिओ वरून मामा, अमृता, मम्मी बोलणे व्हायचे पण जास्त वेळ नाही.. 

जे माने जवळ टाके होते त्यातून पाइप काढलेली त्यात इंजेक्शन सोडत होते.. २ दिवसांनी पहिल्यांदा नाष्टा दिला .. इडली होती खाल्यावर जरा जिभेला चव आली... नंतर ज्युस..  दुपारी भात(मीठ नसलेला), पातळ भाजी, आमटी रात्री परत खिचडी  सकाळ, दुपार, संध्याकाळ औषधेपण होती.

मध्ये मध्ये सकाळी ब्लड घेत होते. कधी कधी त्यांना नस सापडत नसे त्यामूळे मी त्यांच्यावर (नर्सेस) ओरडत होतो.. असे करत करत 21 जुलै 2020 discharge ची तारीख ठरली.. 

पण INR रिपोर्ट डॉक्टर ना हवा तसा नसल्याने 21 जुलैला discharge दिला नाही.. परत उद्या सकाळी INR टेस्ट.. 

22 जुलै उजाडला सकाळी ब्लड घेतले नेहमी प्रमाणे नस सापडली नव्हती त्यामुळे ब्लड घेण्यास वेळ झाला होता.. शेवटी ICU मध्ये डॉक्टर आले.. त्यांनी नर्स कडे रिपोर्ट बद्दल विचाराणा केली .. तर ती म्हणाली अजून आले नाहीत.. मग ते डॉक्टर तिथून बाकीच्या पेशंट ची चौकशी करण्यास गेले. नंतर कधीतरी त्यांना रिपोर्ट मिळाला होता .. तोवर माझा नाष्टा , ज्युस झालेला. 

11..11:30  च्या आसपास ज्यांनी सर्जरी केली ते स्वतः डॉ. पि. व्ही. राव आले.. त्यांना मी हाथ जोडून नमस्कार केला.. त्यांनी औषधांबद्दल सांगितले.. कोल्हापूरचा पेशंट म्हणून त्यांच्या लक्षात होतेच त्यांनी विनीत कुमार यांना पण माहिती दिली असल्याचे सांगितले. त्यांना कोल्हापूर ला येऊन जा म्हणून सांगितले, त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि कॉन्टॅक्ट करेन असेही म्हणाले.. आज डिस्चार्ज आहे हे ही सांगितले.. व तीन दिवसांनी INR टेस्ट करायला पण सांगितले..एवढे सांगून ते पुढे निघून गेले...


Discharge नंतर 3 दिवस इथेच बेंगलोर मध्ये कावेरी गेस्ट हाऊस वर राहायचे होते कारण 24 जुलै ला परत ब्लड टेस्ट होती...

मामांच्याकडून कपडे मागवली. 12 वाजता जेवण आले तेथे जेवणानंतरची गोळी पण घेतली. नंतर 1..2 च्या आसपास व्हील चेअर वरून मला बाहेर आणले..  मस्त वाटत होते पुढे मामा दिसले मी हात दाखवला.. लिफ्ट मधून ग्राऊंड फ्लोवर वर आलो आणि समोर भव्य मूर्ती दिसली मी नमस्कार केला आणी पुढे आल्यावर हॉस्पिटल चे exit दिसले... पहिल्यांदा 7..8 दिवसांनी बाहेरचे जग बघत होतो मस्त वाटत होते.. अखेर बाहेर पडलो आणि मी आणि मामा रिक्षा ने कावेरी गेस्ट हाउस कडे निघालो.. मामा आवर्जून रिक्षावाल्याला हळू चालावं म्हणत होते त्याने पण व्यवस्थित रिक्षा आणली , पप्पा पुढेच दारात थांबले होते कसे काय बरे आहे का त्यानी विचारलं मी हो म्हटलं.. आत आलो आणि बेड वर पडुन राहिलो...

एकंदरीत सगळे छानच वाटत होते पण अजून थोडे दिवस राहायचे याची खंत देखील होती... मामांनी भरपुर कष्ट घेतले, धावपळ केली खरंच खूप धन्यवाद मामांचे...

जेवण पप्पा रूम मधेच बनवत होते म्हणे , भाजी मार्केट शोधून काढले होते त्यांनी.. भाज्या आणत व रूम वर तयार करून खात असत..  आता मामा पण , दोघे मिळुन जेवण करत.. 

विमानाच्या बुकिंग साठी paytm वरून try केलेला पण नेमके त्यादिवशी पेमेंट fail झाले... पैसे तर पप्पांच्या अकाउंट मधून कट झालेले.. त्यामुळे मामांनी दुसर्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन विमानाचे तिकीट book केले.

24 जुलै ला मी आणि मामा हॉस्पिटलमध्ये टेस्ट साठी गेलो.. ब्लड दिले, पैसे refund चे पण काम झाले, दायाटीशियन ची appoint घेतली आणि आहाराबद्दल विचारले.. नंतर सुजाता मॅडम ना मामा भेटले.. त्यांना सगळे व्यवस्थित आहे , कोल्हापूर ला येण्याचे निमंत्रण मामांनी दिले आणि आम्ही बाहेर पडलो, पण रिक्षात बसल्यावर कळाले रिपोर्ट मेल वर पाठवण्यासाठी मेल द्यायचा राहिला.. 

संध्याकाळी सुजाता मॅडमनी मामांना रिपोर्ट Whatsapp वर पाठवलेला तो नॉर्मल होता.. रिपोर्ट आता 2.. 3 रेंज मधेच ठेवायचा होता.. 

पप्पानी आधीच गाडी बुक केलेली, उद्या 25 जुलै कोल्हापूर ला जायचे. 

जसा 25 जुलै उजाडला आम्ही सगळे आवरून नाष्टा करून बसलो तोवर गाडीपण आली, आम्ही एअरपोर्ट वर पोचायच्या आधी परत एकदा नाश्ता केला आणि एयर पोर्ट वर पोचलो, आम्ही 3 तास आधीच पोचलो होतो, एयर पोर्ट वर मला मामांनी व्हील चेअर उपलब्ध करून दिलेली, शेवटी gate जवळ पोचलो आणि वाट पाहत राहिलो... 

अखेर बस आली Airindia ची सगळ्यांना घेऊन विमानाकडे न्यायला. आणि एकदाचे आम्ही सगळे बस मध्ये चढलो आणि बस ने विमानाजवळ सोडले.. बेंगलोर चे kempegauda international airport खुपच भव्य होते... आम्ही विमानात बसलो विमान पण 10.. 15 मिनिटे आधीच सुरू झालेले.. आणि थोड्याच वेळात take off झाले. मस्त वाटत होते .. एकदाचे घरी पोचणार.. 

कोल्हापूर एअरपोर्ट वर भाई आणि  पप्पू आधीच येऊन थांबलेले आम्हाला D Y Patil हॉस्पिटलमध्ये बस मधून जाण्यास सांगितले, भाई आणि पप्पू बस च्या मागून पोचले हॉस्पिटलमध्ये, तिथे कळाले की swab टेस्ट करणार होते, पण मामांच्या ओळखीने ते काय करावे लागले नाही आम्हाला होम कॉरांटाईन करण्यात आलेले.. यामध्ये सम्राट ने पण नगरसेवकाकडून होम कॉरांटाईन चे प्रिंट आणलेले...

नंतर आम्ही घरी पोचलो.. दारात रांगोळी काढून ठेवलेली, वाह! मम्मी आणि अमृताने ओवाळले आणि मी गृहप्रवेश केला एकदाचा.

ही भावना काहीतरी वेगळीच होती बऱ्याच दिवसांनी घरचे सगळे पहायला मिळाले.. अद्वैत ला पाहून तर अंगात आणखीन एनर्जी आल्याचा भास झाला.. 

एकदाचे हुश्श झाले...

 

Monday, July 13, 2020

13 जुलै 2020

सकाळी उठून सगळे हॉस्पिटल मध्ये गेलो .. 

डेंटल डॉक्टर यायचे होते, आल्यावर दात cleaning केले. आणि मग मामा आणि पापांची RTGS ची तयारी सुरू झाली, सगळे होईपर्यंत 5:00 वाजले असतील हॉस्पिटलमध्ये आजच भरती व्हायचे होते... 

तडक रिक्षा करून सगळे रूम वर आलो आणि कपडे भरली ब्यागेत  , पप्पाना आणि मामांना जाताना नमस्कार केला आणि मी व मामा त्याच रिक्षा ने परत हॉस्पिटलमध्ये आलो.. तिथे मामांनी admission ची प्रोसेस पूर्ण केली पण त्यासाठी भरपूर पाळावे लागले त्यांना..

अखेर रूम मध्ये आलो, रूम तर छानच होती,   त्याचे pics अमृता, भाई आणि पप्पाना पाठवले. थोड्या वेळात नर्स ब्लड घेऊन गेली, नंतर डॉक्टर येऊन आधी काही सर्जरी झाली आहे का , स्मोकिंग करता का वगैरे वगैरे विचारून गेले... नंतर इकोचे मशीन रूम मध्ये  आणून चेक केले, नंतर युगा आणि रणजित दाजींचा विडिओ कॉल आलेला त्यांनी टेंशन घेऊ नको सगळे ठीक होईल म्हणून धीर दिला... त्यांच्याशी बोलून झाले आणि जेवण केले.. 

फक्त पेशंटलाच जेवण , मामाचा उपवास होता आधी कॉफी मागावलेली , नंतर अमृताचा फोन आला थोडा वेळ बोलून झाले तोवर भाईचा कॉल आला त्याने पण तब्बेतीची चौकशी केली परत अमृताचा कॉल झाला पिल्लुला विडिओ कॉल वर पाहिले खूप छान वाटले  मम्मी आणि अमृता पण होतीच विडिओ कॅलवर...  अमृता आणि अद्वैत दोघे होतेच आणि आहेतच माझ्यासोबत नेहमी.. अमृताने अद्वैत आणि तिचा स्वतःचा फोटो पाकिटात ठेवलेला माझ्या त्यामुळे खूप मस्त वाटले होते..

आमचं बोलणे सुरू होते तोवर नर्स आली XRay काढायचा आहे त्यासाठी खाली गेलो, नंतर आलो आणि मग हेअर कटिंग साठी नेले मग बिपी चेक केले... अमृताचे जेवण झालेले मी ब्लॉग लिहीत होतो... तिचा मेसेज आला झाला काय XRay म्हणून... आता ब्लॉग थांबवून अमृताशी बोलतो...उद्या हार्ट सर्जरी आहे... सगळे ठीक होईल याची खात्री आहेच दादा आहेतच पाठीशी, डॉक्टर पण तेवढे जिनीयस आहेतच... 

Always Hope For The Best, 👍All Izz Well Rohit👍 

Amruta, Advait , Mummy, Pappa I love you Soooooo much ... 

TAKE CARE ALWAYS


11 व 12 जुलै 2020

आज निवांत आवारत होतो सगळे काही कामच नव्हते...

मी पप्पा आणि मामा कोविड19 टेस्ट रिपोर्ट आणायला गेलो.

बरं झालं रिपोर्ट निगेटिव्ह आले... अमृताला मेसेज केला आज पाप्पा ममींचा  लग्नाचा वाढदिवस त्याच्या शुभेच्छा दिल्या.

नंतर रूम वर आलो आणि थोडावेळ झोपलो. संध्याकाळी वेळ कसा गेला कळालेच नाही सगळे हॉटेल्स बंद.. त्यामुळे swiggy वरून जेवण मागवल. 

आता उद्या डेंटल चेक अप ....


10 July 2020

सकाळी आवरून मी पप्पा मामा हॉस्पिटल ला गेलो ... नारायणा हेल्थ कार्डियाक सेंटर बेंगलोर. मोठे हॉस्पिटल ... सगळे स्टेप बाय स्टेप चॉकशी करत करत रजिस्ट्रेशन, इको वगैरे  करत करत डॉक्टर पी. व्ही. राव पर्यंत पोचलो... पप्पाना आत सोडले नव्हते ते बाहेरच होते . डॉ. पी. व्ही. राव यांनी खात्री दिली की जास्त टेंशन चे काही काम नाही आपण हे ऑपरेशन करू शकतो...

तसे बाहेर येऊन अमृताला, मम्मीला सांगीतले.. त्यांना जरा हाय से वाटले. डॉ. पी. व्ही. राव यांच्या असिस्टंट सुजाता यांनी चांगली हेल्प केली. नंतर ब्लड टेस्ट आणि कोविडं19 टेस्ट सांगितली.. ब्लड टेस्ट चे रिपोर्ट मिळाले लावकर.  मामांना पण कोविडं19 टेस्ट कंपलसरी सांगितली कारण ते माझ्या सोबत राहणार होते. कोविडं19 ची टेस्ट रिपोर्ट उद्या मिळणार होते. आणि सुजाता मॅडम नि पण डायरेक्ट सोमवारी या म्हणून सांगितले. नंतर रूम वर येताना आम्ही रात्रिचे जेवणाचे पार्सल घेतले आणि रूम वर जेवण करून अमृताशी बोलून  झोपलो. 
 
उद्या फक्त कोविडं19 रिपोर्ट कॉलेक्ट करणे...


9 July 2020 travel to benglore

8 July 2020

नेमका आजच सकाळी संभाजी नगर मध्ये मामांच्या घरी बॅग ठेवल्या आणि त्याच दिवशी दुपारी तिथं कोरोना पेशंट सापडला , मग काय मामांना आणि ब्यागांना पण घरी आणले उद्या सकाळी घरातूनच बेळगाव चा प्रवास करायचा तसे ड्राइवर ला मामांनी फोन करून कळवले. 

सकाळी पप्पा (अमृताचे) भेटून गेले होते.. संध्याकाळी भाई पण येऊन गेला. 

रूपा दिदीचा अमृताला मेसेज आलेला रोहीत बरोबर बोलणार आहे म्हणून , मी वर जाऊन कॉल करत होतो पण काही लागला नाही.


9 जुलै 20120

युगाचा वाढदिवस तिला whatsapp वर शुभेच्छा दिल्या.

रात्री अमृता थोडी भावूक झालेली होणारच आधीच हळवी ती ,   तिने मला धीर दिला मी तिला धीर दिला आणि त्यात मला कधी झोप लागली कळलेच नाही.

सकाळी उठून अद्वैत कडे पाहिले तो गाढ झोपलेला त्याची पापी घेतली.. नंतर  आवरून नाष्टा केला आज उप्पीट केलेले,  मोठया मामी , धाकट्या मामी, पप्पू आणि सम्राट पण आलेला. 

 तोवर ड्राइवर आला, त्याचा चहा नाष्टा झाला आणि आम्ही बाहेर पडत होतो बाहर पडण्या आधी देवाला नमस्कार केला नारळ ठेवला आणि सगळे व्यवस्थित होउदे असे म्हटले, जाण्याआधी अमृताने आणि मम्मीने घट्ट मिठी मारली दोघींच्याही डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या. मी दोघीना काळजी घ्या म्हणून सांगून बाहेर पडलो.

मी, पप्पा,  मामा आणि ड्रायव्हर निघालो तवेरा गाडीतून,
थोडे अंतर कापल्यावर कळाले जॅकेट राहिले म्हणून परत ते मागवून घेतले पप्पू आणि सम्राट येऊन जॅकेट देऊन गेले, आणि प्रवास सुरु झाला, कोगणुळी जवळ आम्हाला पोलिसांनी अडवले, सगळे झाल्या नंतर आम्ही बेळगाव एअर पोर्ट वर जाण्यास निघालो वाटेत चहा घेतला आणि थोड्या वेळातच एअरपोर्ट वर पोहचलो. गाडीतच सगळ्यांनी जेवण केले, फ्लॉवर ची भाजी, चपाती, झुणका , वडी आणि दही भात  मी तर आडवा हाथच मारला.

ड्रायवर कोल्हापूरला जायला निघाला आणि आम्ही एअरपोर्ट वर जाण्यासाठी निघालो. पप्पांचा पहिला विमान प्रवास, मामांचा बहुदा चौथा असावा आणि माझा दुसरा. एअरपोर्ट च्या सगळ्या चॉकशीतुन बाहेर पडल्यावर निवांत खुर्चीवर प्लेन ची वाट पाहत बसलो. थोडा पाऊस होता त्यामुळे flight कॅन्सल होण्याची भीती होती पण सुदैवाने flight वेळेवर निघाली, विमान प्रवासाचे विडिओ आणि फोटो काढत बेंगळुरू कधी आले ते कळालेच नाही. 

एअरपोर्टचिच टॅक्सी बुक करून गेस्ट हाउस वर आलो.  रूम्स छानच होत्या, आणि गॅस पण होताच, अमृताला कॉल करून सांगितले , मस्त चहा केला,  तोवर रामदूत चे 2 मिस्ड कॉल पडलेले, त्याला कॉल केला आणि कुठे आलोय ते सांगितले आणि अमृता डिटेल मध्ये सांगेल असेपण सांगितले. 

रात्री 8 ला जेवण केले आणि झोपलो.. सकाळी लवकर 9:30 ला हॉस्पिटलमध्ये जायचे होते... 
Wednesday, October 16, 2019

Tuesday, August 1, 2017

1st August 2017.. 5th month started

Today Advait's 3rd dose (Injection).
Amruta told he was cried too much today. I am eger to meet Advait . After office I directly ran to meet him. He is ok now but little bit crying.

While drinking his milk he stairs at me .. I am also just talking with him with baby language.... After his milk finished he started laughing.. giggling .. Talking...  I am so happy this time. Automatically my eyes gets wet.. It's tears of happiness...

Love you soooooo much my cutie pie...

I came back to home Amruta told that Advait h as fever..

It's ok I think due to injection it happened.. defiantly he will be fit and fine tomorrow...