Powered By Blogger

Search This Blog

Monday, August 13, 2012

भारतीय.....भारतीय म्हंजी काय व भौ ? मराठी मुव्ही



 ऑफिस मधून घरी येतो न येतो तोच राकेश आला. काल ठरवलेले कि भारतीय चित्रपट पहायला जायचे. आम्ही दिघे कॉम्पुटरवर   perfume movie पहिला. तोवर 9 वाजले शो 9:30 चा होता.... रामला पण फोन करून बोलावून घेतले. कधीनही ते सगळे वेळेवर गेलेलो मुवि पहायला. 

आणि चित्रपट चालू झाला.....

भारतीय मराठी मुव्ही

         चित्रपट एका अडनेड गावावर घेतला आहे. जे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेले दाखवले आहे ते गुगलवर देखील शोधून सापडत नसत. सीमेवर असल्यामुळे कोणतेच राज्य या गावाची दाखल घेत नसते. तिथे शहरातून युवक (सुबोध भावे ) येतो कारण तिथे त्याचे घर असते. गावात पहिल्या पासूनच दोन विरोधी गट दाखवलेले आहेत. चित्रपट खरा सुरू होतो जेव्हा युवक त्या गावात येतो. त्याला त्याचे घर विकायाचे असते. त्यासाठी तो महाराष्ट्र कर्नाटक राज्यात 7/12 उतार्यासाठी चाक्करा मारत बसतो. पण त्याला कळते कि हे गाव कुठल्याच राज्याच्या हद्दीत नाही. म्हणजे हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे.

   आता भारतात एक दुसरे राष्ट्र स्थापन करण्याच्या तयारीस सर्व गाववाले लागतात. पुढे काय काय काय होते ते मी सांगत नाही त्यापेक्षा ते तुम्हीच पहा....

 कॉमेडी असून तितकाच serious विषय या चित्रपटाच्या निर्मात्याने निवडला आहे आणि लोकांपर्यंत पोचावालेला आहे... तुम्ही हा चित्रपट जरूर पहा.........




No comments:

Post a Comment