प्रिन्सने घोडागाडी पकडली आणि तो वर्यावर स्वार झाला. तो आता मिळेल त्या मार्गाने घोडागाडी पळवू लागला. वाटेत येणार्या सर्व शत्रूचा फडशा पडत पुढे निघाला.पण तो एकटा नव्हता त्याच्या मागे एक राक्षस घोडागाडी घेऊन लागला होता.
त्या रक्षसाची आणि प्रिन्सची घोडागाडी जवळ जवळ आली. इतक्यात प्रिन्सने आपली घोडागाडी सोडून त्या रक्षसाच्या अंगावर झेप घेतली; तसे दोघे खाली पडले आणि गडगडत एका रिंगणात येऊन पोचले. पण तो रक्षस एकता नव्हता त्याचे एक दुसरे रूप तयार झाले होते. आत्ता प्रिन्स आणि ते दोन राक्षस.
त्या तिघात तुंबळ युद्ध सुरु झाले. कसेबसे प्रिन्सने एका राक्षसाला जवळ जवळ संपवले पण आणखीन एक राक्षस होता तो प्रिन्सवर धाऊन येणार इतक्यात...... राजकुमारी फरहा मदतीला धाऊन आली आणि तिने एका बाणात त्या राक्षसाला यमसदनी पाठवले. प्रिन्स व राजकुमारी ते दोघे आता किल्ल्याच्या दिशेने चालले.... ते किल्ल्यात पोचले पण हजारांच्या संख्येने राक्षसांनी त्याना चहुबाजूनी घेरले.
पण तोवर सर्व लोक त्या किल्ल्यात आले होते. सर्व लोकांनी राक्षसांबरोबर युद्ध सुरु केले. प्रिन्स आणि राजकुमारीने त्यातून वात काढत किल्ल्याच्या प्रवेश केला आणि दरवाजा अडकवलेला दोर कापून टाकला; त्यामुले ते सुखरूप किल्ल्यात पोचले. पण नेहमी प्रमाणे राजकुमारीने घाई केली आणि एका दरवाज्यातून आत गेल्यामुळे तो दरवाजा बंद झाला आणि प्रिन्स बाहेरच अडकला. ती राजकुमारी दरवाजा उघडण्यासाठी शोधाशोध करू लागली तोवर प्रिन्सवर राक्षसांनी हमाला चढवला. प्रिन्स सर्वाना तोड देत होता आणि मारत होता; तोवर दार उघडले आणि प्रिन्स सुखरूप आत आला...
किल्ल्यात ते किल्ल्याच्या आत पर्यंत पोचले पण तिथे त्याचा शत्रू आला तो म्हणजे वजीर. त्यानेच हे सगळे घडवून आणले होते. पण सैतानी टाकती मुले तो एका भयानक राक्षसात रुपांतरीत झालेला. त्याने राजकुमारीला बंदी केले आणि प्रिन्सला पाताळात फेकून दिले.
प्रिन्स खाली पडत होता तसा त्याच्या आतील सैतान जागा झाला. आणि तो सुखरूप एका भुयारी मार्गात पोचला.
आता राजकुमारीला प्रिन्स वाचवू शकेल ??? प्रिन्स परत आपले राज्य मिळवू शकेल????
पुढे काय होणार ????
No comments:
Post a Comment