Powered By Blogger

Search This Blog

Tuesday, August 28, 2012

Prince of persia the forgotten sands - Part 1

                                             प्रिन्स ऑफ पर्शिया दी  फोर्गोटन स्यांन्ड


 गेम सुरु होतो तेंव्हा  प्रिन्स पहिल्या पासूनच एका अंतराळी महालात दाखवला आहे.


तिथे एक जलकुंड आहे. प्रिन्स त्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो पण त्यात एक चेहरा दिसतो.
 आणि त्या पाण्यातून एक हात येतो आणि प्रिन्सचा हाथ पकडतो.

नंतर गेमची सुरुवात होते. प्रिन्स घोड्यावरून आपल्या राज्यात येत असतो पण त्याच्या राज्यावर आधीच हमला झालेला असतो. हा हमाला कोणी केला ते काही प्रिन्सला काळत नाही. पण त्याचा भाऊ मालीक आणि त्याचे सैन्य शत्रूंशी मुकाबला करत असते. प्रिन्सला काहीही करून आपल्या भावाला भेटायचे असते. तो एक एक अडथळे पार करत करत पुढे जात असतो.  

  
 सगळीकडे अफरातफरी माजलेली असते. पण प्रिन्स कशाचीही परवा न करता वाटेत येईलत्या शत्रूचा खात्मा करत पुढे जात असतो. त्याचे एकाच ध्येय असते ते म्हणजे त्याचा भाऊ मलिक याला भेटणे.   





प्रिन्स शत्रूचा खात्मां करत करत किल्ल्यात पोचतो खरा पण त्याचा भाऊ मलिक खाली असतो आणि त्याचावर हमाला होत  असतो. मलिकला व त्याच्या बरोबर असणाऱ्या सैन्याला दरवाज्याचा आत जायचे असते दरवाजा उघडा आहे पण बंद करायचा मार्ग प्रिन्स जवळच आहे. प्रिन्स सफाईने मोठा दरवाजा बंद करतो आणि भावाचे प्राण वाचवतो. पण परत त्यांच्यातील अंतर वाढले आहे. मालीक पुढे जाऊ लागतो आणि प्रिन्सला खजाना असलेल्या ठिकाणी येण्यास सांगतो. 

प्रिन्सला परत अडथळे येण्यास सुरु होतात. बरेच शत्रू त्याच्यावर हमाला चढवत असतात पण एका खऱ्या योध्याप्रमाणे प्रिन्स त्यांचा नायनाट करत सुटतो. जाता जाता त्याला एक पाण्याचा दरवाजा दिसतो. आणि तो त्यात घुसतो

तिथे त्याला आठवण होते कि हे आपण आधी पहिले आहे याची.  तो त्या अंतराळी महालात आलेला असतो. तिथे त्या जालकुंडातून रझिया नावाची जीन बाहेर येते.



 ती त्याला सांगते कि; "तुझा रस्ता खूप कठीण आहे. आणि तुला पुढे खूप संकटाना तोंड द्यायचे आहे. त्यासाठी मी मध्ये मध्ये तुझ्या मदतीला येत राहीन. तू न चुकता तुला जिथे जिथे हा पाण्याच्या दरवाजा दिसेल त्यातून आत ये."  आणि असे सांगून ती त्याला एक शक्ती प्रदान करते. ती म्हणजे जर कुठे मारणार असे वाटेल तिथे थोड्यावेळापुरता क्षण मागे घेता येइल. यामुळे शत्रूची चाल आधीच समजलेली असेल. असे म्हणून रझिया तिथून गायब होते.
 

प्रिन्स आता त्या पाण्याच्या दरवाज्यातून परत बाहेर येतो  आणि कसाबसा खजान्याच्या ठिकाणी पोचतो. तिथे शत्रू  अधिच पोचलेले असतात. तो त्या शत्रूना ठार करतो आणि पुढे जातो.

पुढे जाता जाता त्याला त्याचा भाऊ मलिक भेटतो. मालीक, प्रिन्स आणि थोडे सैन्य गप्पा मारत मारत एका मोठ्या रूम मध्ये येतात. तिथे मालीक एक दरवाजा उघडतो.





 पण तो दरवाजा उघडल्यामुळे वाळू त्या खोलीत भरायला लागते. जमीन हादरू लागते. दार उघडलेल्या चवीचे दोन तुकडे होतात. त्यातला एक तुकडा प्रिन्स उचलतो आणि एक मलिक आणि ते तुकडे चमकू लागतात . तोवर वरून छत खाली पडते. ते दोघांच्या मध्यात पडते. त्यामुळे ते दोघे पुन्हा वेगळे होतात. जसे ते वेगळे होतात तसे जमिनीतून सांगाडे बाहेर येऊ लागतात. मलिक बरोबरचे जे सैन्य असते ते त्या  सांगाड्याच्या स्पर्शाने वाळूच्या पुतळ्यात बदलले जातात. आता मालीक आणि प्रिन्स वेगवेगळे मिळेल त्या दिशेने पळत सुटतात.

प्रिन्स वाट  काढत काढत घोड्याच्या तबेल्यात पोचतो .... पण काहीतरी इथे आहे याची जानीव प्रिन्सला होते.........


काय असू शकते इथे??????











 






No comments:

Post a Comment