प्रिन्स आता भुयारी मार्गात शिरला होता पण त्याचे रूप पालटले होते तो एका सैताना मध्ये रुपांतरीत झालेला. पण या रुपात त्याला भरमसाठ ताकत मिळालेली असते पण थोड्यावेळापुरती...
तो एकावर एक शत्रूवर मात करत दुसर्या राक्षसा पर्यंत पोचतो.... आधीच्या लेवल मध्ये भारताची राजकुमारीने ( फरहा ) त्याचा जीव वाचवलेला असतो. पण तिने प्रिन्सला या रुपात कधीच पाहिलेले नाही आहे...
राजकुमारी ( फरहा )
प्रिन्सचे सैतानी रूप
प्रिन्स ऑफ पर्शिया मधला दुसरा राक्षस.... राक्षस नाही तर ती राक्षसिनच होती......
हिला हारावन्यास काही जास्त वेळ लावला नाही प्रिन्सने.... पण जे व्हायचे नको होते तेच झाले राजकुमारीने त्याला या रुपात पहिले....त्यामुळे राजकुमारी नाराज होती... तिला कळेना कि याच्यावर विश्वास ठेवावा कि नको... पण प्रिन्सने घडलेली सर्व हकीकत सांगितली. "तो नावेतून येत असताना त्याच्यावर हमाला झाला आणि त्याची मैत्रीण कैलीना शत्रूच्या ताब्यात अडकली आणि याला त्यातच हा शाप मिलाला"....
मैत्रीण कैलीना
राजकुमारीला थोडेफार ते पटले.. मग ते दोघे लोकांचा जीव वाचवायला गेले.... यात राजकुमारी दुसर्या मार्गाने गेली आणि प्रिन्स दुसर्या. तो आगीत सापडलेल्या लोकाना वाचवायला गेला खरा पण स्वताहा अडकला..
जिथे अडकलेला तिथे एक मोठा पुतळा आणि मोठा दरवाजा होता. तो मोठा पुतळा त्या दरवाज्यावर आपटून तो दरवाजा मोडायचा होता.
बराच प्रयत्न केला आणि शेवटी त्याला यश आले. सगळे लोक मुक्त झाले.....
पण प्रिन्सला एवध्यात थांबायचे नव्हते त्याने घोडागाडी पकडली आणि वार्यावर स्वार झाला.....
तो कुठे निघाला आहे ???
No comments:
Post a Comment