Powered By Blogger

Search This Blog

Friday, August 31, 2012

Prince of persia the forgotten sands - Part 2


प्रिन्स घोड्याच्या तबेल्यात आला आहे पण कोणीच नाही आहे. एक घोडा पण नाहीत  सगळीकडे भयान शांतता.  या भयान शांततेत काहीतरी आहे याचा सतत भास प्रिन्सला होत आहे. तो जसा पुढे सरकतो तस जमिनीतून काहीतरी भयानक बाहेर येत असते. प्रिन्सच्या चहुबाजुनी सांगाडे एका मागून एक जमिनीतून बाहेर येत असतात. प्रिन्स वेगाने आपली तलवार बाहेर काढतो आणि लढायला तयार होतो.


 तो त्या सांगाड्याना एक वर एक मारत सुटतो. सगळ्याना मारून झाल्यावर तो पुढे जाण्यास निघतो.  कसाबसा वाट काढत काढत तो पुढे पुढे जाऊ लागतो. त्याला कळत नाही त्याचा भाऊ जिवंत पण आहे कि नाही ते.  
  


 वाट  काढत काढत तो अशा एका ठिकाणी पोचतो तिथे समोरून एक सांगाडा त्याचा दिशेने यायला लागतो. पण जसा सांगाडा त्याच्या जवळ येतो तस भिंतीतून एक कुर्हाड बाहेर येते आणि त्या सांगाड्याचा खेळ तिथेच संपतो.
 पुढे तश्या बर्याच कुर्हाडी लटकत असतात. पण प्रिन्स त्यातून वाट काढण्यात सफल होतो.   

 प्रिन्स एका दालनात येतो त्याच्या समोरच्या दालनात त्याचा भाऊ मलिक दिसतो. भावाला बघून प्रिन्सच्या जीवात जीव येतो. पण तिकडे जाण्यास वाट नसते. प्रिन्स भावाला म्हणतो जर आपण आपले मेडल(त्या चवीचे तुकडे) जोडले तर हे सगळे थांबेल. पण मलिक म्हणतो इतर लोकाना जर त्या सांगाड्याने स्पर्श केला तर ते मातीचे पुतळे होतात पण आपण अजून पुतळे झालो नाही म्हणजे यात कहितरी जादू आहे. यामुळे आपण दोघे वाचू शकतो. असे म्हणून तो प्रिन्सला फाटका जवळ भेटायला सांगतो आणि तिथून निघून जातो.     

पुढे प्रिन्स परत मोठ मोठ्या संकटाना पार करत करत किल्ल्याच्या अंगणात येतो ..... तिथे त्याला रताश नावाचा राक्षस दिसतो.

पण राजीयाने याच्याबद्दल सांगितलेले असते कि याच्या बरोबर लढण्यात अजिबात वेळ घालवू नको कारण तो बराच शक्ती शाली आहे. त्यामुळे तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे जाऊ लागतो.


 तो एका ठीजानी पोचतो पण तिथे सांगाड्या सोबत एक राक्षस पण असतो. तो बराच अक्राळ विक्राळ असतो.  
 बर्याच झुंजी नंतर त्याला हरवण्यात प्रिन्सला यश येते. 


प्रिन्स पुढे किल्ल्याच्या फाटका जवळ येतो त्याला तिथे मलिक दिसतो पण तो दुसर्या दिशेला असतो. मलिक प्रिन्सला म्हणतो तुला फाटक बंद करावे लागेल त्यामुळे ते सांगाडे आत अडकून बसतील.  


प्रिन्स ते फाटक प्रयत्न करून बंद करतो. पण मलिक वरच्या बाल्कनी मध्ये असतो. प्रिन्स त्याला म्हणतो जर आपल्या लोकांचे प्राण वाचवायचे असतील तर आपल्याला हे पदक (चवीचे भाग ) एकत्र जुळवले पाहिजेत. पण मलिक म्हणतो जर एवढी घाई असेल तर तुझे पदक माझ्याकडे फेक मी ते जुळवतो. पण प्रिन्सच्या मनात काय असते काय माहित तो ते पदक त्याला देत नाही.

मलिक म्हणतो मला वाटलेच होते तू देणार नाही ते असे म्हणून पुढे जातो. प्रिन्स हि त्याच्या वाटेने पुढे जाऊ लागतो. तिथे त्याला परत पाण्याचा दरवाजा दिसतो. आणि तो थेट त्यात शिरतो. तिथे त्याला रजिया भेटते. ती म्हणते जर तू पदक लवकरात लवकर जुळवले नाहीस तर सैतानी ताकती आणखीन ताकतवर होतील. जर पुढे तुला मलिक भेटला तर तू समजाऊन किंवा बळजबरीने काढून घे. आणि ते दोन तुकडे एकत्र जोड.

प्रिन्स म्हणतो मी काही त्याच्याशी बळजबरी करणार नाही तो एक चांगला राजा आहे. तो लोकांचे कल्याणाच पाहतो. सध्या त्याच्यावर सैतानी शक्तीचा वावर आहे म्हणून तो असा वागत आहे.

रझिया म्हणते ठीक आहे आणि पाण्याच्या रुपात येऊन प्रिन्सला शक्ती प्रदान करते.





 रझिया प्रिन्सला कोणती शक्ती प्रदान करते ते लवकरच कळेल ............................................. 

 
   

No comments:

Post a Comment