Powered By Blogger

Search This Blog

Monday, September 3, 2012

Prince of persia the forgotten sands - Part 3

राझिया प्रिन्सला शक्ती प्रदान करते त्या शक्तीचा प्रभाव पडताच तो तिला विचारतो हे काय आहे ???

रझिया म्हणते मी तुला एक अशी शक्ती दिली आहे ज्याने तू थोड्यावेळापुरते पाण्यावर अधिकार गाजवू शकतोस असे म्हणून ती गायब होते.

प्रिन्स आपला प्रवास पुढे सुरु ठेवतो. पुढे गेल्यावर त्याला वाट  सापडेनाशी होते. सगळीकडे पाणी असते.





त्याला राझीयाने दिलेल्या शक्तीची आठवण होते. तो त्या शक्तीचा वापर करून पाण्यावर झेप घेतो. कारण त्या शक्तीमुळे पाण्याचे बर्फात रुपांतर झालेले असते. त्यामुळे तो एक एक पाण्याचा फवारा पकडत पकडत पुढे सरकतो. 



तो एका ठिकाणी येतो आणि खाली मोठी खोली असते. त्या खोलीत आल्यावर परत त्याच्यावर सांगाड्याचा हमाला होतो.



तो त्याना जोमाने टक्कर देऊन पुढचा रस्त्याला लागतो. तो वाट काढत काढत एका नाल्याजवळ येतो.



तो नाल्यात येतो दोन्ही बाजूने नाल्याचे पाणी पडत असते.
तो शक्तीचा वापर करतो आणि सहज वर पाणी पडत असते तिथे पोचतो. पण पुढे वाळूच्या राक्षसाशी त्याचा सामना होतो.


तो  स्वत: सांगाडे  निर्माण करत असतो. त्यामुळे हे प्रिन्स पहिला त्याला निशाणा बनवतो आणि मग बाकीच्या सांगाड्याना खल्लास करून टाकतो आणि पुढे जाऊ लागतो. आता तो एका आलिशान अशा स्नानगृहात येतो.




तो पाण्याच्या शक्तीमुळे वरती पोचतो

 तिथे त्याला मागून मलिकची हाक येते.


प्रिन्स त्याला पदक देण्याबाबत सांगतो ; पण मलिकला वाटते कि हा पदक घेऊन ताकद मिळवण्याचा नादात आहे. त्याच्या गैर समाजाने तो प्रिन्सला ढकलून देतो आणि म्हणतो जर पुढे असा वागलास तर  तुझ्यावर राजद्रोहाचा खटला करीन. असे म्हणून मलिक तिथून पुढे निघून जातो.


प्रिन्स त्याला हाका मारतो पण तो त्याच्याकडे दुर्लक्ष करून मलिक निघून जातो.
प्रिन्स परत पुढे जाण्यास निघतो. अडथळे पार करत करत तो पुढे जात राहतो.


तो वाट  काढत काढत पुढे येतो पण पुढे रताश राक्षस असतो आणि तो त्याच्यावर आगीचे गोळे फेकत असतो






प्रिन्स वाट  मिळेल तिकडे पळत सुटतो . नशिबाने प्रिन्स एका मोठ्या खोलीत येतो तिथे एक भले मोठे आणि विचित्र असे यंत्र असते.


तो ते यंत्र सुरु करण्यास यशस्वी होतो खरा पण ते यंत्र नेहमी दिशा बदलत असते. त्याला यंत्राच्या दुसर्या बाजूला जायचे असते.


 तो कसाबसा त्या यंत्रावर स्वार होतो.
 हळू हळू एकावर एक त्या यंत्राची कोडी सोडवत तो पुढे जात राहतो .



आणि एका अशा ठीकानी येतो जिथून सहज यंत्रावरून उडी मारतो आणि पुढे एका बाल्कनीत येतो.






त्याला पुढे सिहासन कक्ष दिसते.

तो कशीबशी वाट  काढत काढत  सैतानांचा खात्मा करत करत



 त्या सिंहासानाच्या खोलीत प्रवेश करतो.  तिथून पुढे जाता जाता त्याला मलिक त्या रताश राक्षसाबरोबर युद्ध खेळताना दिसतो.




  तो त्याच्यापासून बर्याच लांब अंतरावर असतो आणि तिथे जाण्यासाठी प्रिन्सला बरेच अडथळे पार करायचे असतात.



काय प्रिन्स त्याच्यापर्यंत पोहचु शकेल? काय मलिक त्या राक्षसाला मारण्यात यशस्वी होईल????
 


No comments:

Post a Comment