Powered By Blogger

Search This Blog

Sunday, September 16, 2012

Prince of persia the forgotten sands - Part 5

प्रिन्सला आता काही मार्ग सापडत नाही.... कुठे जायचे हेच त्याला समाजत नसते . तोवर त्याच्यासमोर गिधाडे जमा होतात .



प्रिन्स क्षणाचाही विचार न करता त्याच्यावर झेप घेतो आणि त्या गीधाडाच्या अंगावरून उडी मारून पुढे उडी  मारतो . पुढे पोचल्यावर खाली त्याला मलिक सांगाड्याना  मारताना त्याला दिसतो .

 पण जेव्हा मलिक त्या सगळ्या सांगाड्याना खल्लास करतो तेव्हा त्याचे रुपांतर रताश मध्ये व्हायला चालू होते .



 मलिक आता रताश राक्षसामध्ये रुपांतरीत झालेला प्रिन्सला दिसतो. मलिक(रताश) तिथून निघून जातो .  प्रिन्स पुढे संकटाना तोंड देत देत , अवघड परिस्थितीतून स्वताःची सुटका करत करत एका ठिकाणी पोचतो .   




त्याला त्याचे २ शिपाई दिसतात .  तो एका मकबर्या जवळ आलेला असतो . तो एक गोलाकार मैदानां सारखा असतो. आणि त्याच्यावर चार भिंती उभ्या असतात.
 
पण तिथे अचानक राताश येतो.  त्या दोघांच्यात घमासान युद्ध सुरु होते .



रताशची ताकत हळू हळू कमी होऊ लागते. जेव्हा रताशला वाटते कि त्याचा शेवट जवळ आला आहे तेव्हा तो तिथून पळून जातो.

प्रिन्सला कळते कि रझियाने जे काही सांगीतालेले ते सगळे खरे होते. तो पुढे जात जात जीनच्या शहरात दाखल होतो.  तो एका ठिकाणी पोचतो जिथे बर्याच खोल गेलेल्या गोल गोल पायऱ्या दिसतात. तो त्या उतरू लागतो .

 पण अचानकपणे त्या कोसळू लागतात.
 तो कसाबसा स्वतः ला सांभाळत एका दरवाजा मध्ये घुसतो.

त्याला तिथे पाण्याचा दरवाजा दिसतो. आत गेल्यावर पुन्हा रझिया त्याला भेटते.

रझिया त्याला म्हणते रताश हा सुद्धा एक जीन आहे तो आमच्यातलाच होता. पण त्याने शैतांनी मार्ग निवडला आहे. आणि तूच यातून आमची आणि सर्वांची सुटका करू शकतोस.
प्रिन्स : यासाठी मला काय करावे लागेल.
रझिया : तू मला जीनच्या शहरात मंदिरात भेट. तु त्या शहरात स्वतहा जाऊ शकणार नाहीस मी माझ्या आठवणी तुला देते म्हणजे तुला वाट  शोधण्यास अडचण येणार नाही. असे म्हणून ती गायब होते.

प्रिन्सला मिळालेल्या शक्तीमुळे तो जुन्या काळी शहर कसे असेल ते पाहू शकत असतो आणि त्यातून वाट काढत पुढे जात राहतो.     




प्रिन्स त्या शहराच्या मंदिरात प्रवेश करतो. तिथे रझिया त्याला भेटते. त्या मंदिरात चार पुतळे असतात त्यातला एक पुतळा स्वतः राझीयाचा असतो. प्रिन्स तिला म्हणतो मी यात तुला ओळखले पण बाकीचे कोण आहेत?

रझिया : आम्ही चौघे चार जनजातीचे मुखिया होतो.आम्ही माणसांसोबत राहून एक सुखमय शहरे निर्माण करत होतो. पण आमच्यातील काहीजनाना  माणसां सोबत राहणे आवडत नसे. त्यातला एक म्हणजे रताश.




रताशने सुलेमान राजाचे साम्राज्य उध्वस्त करण्याची शपथ घेतली. त्याने आपली शक्ती वाळवंटातील वाळू  आणि वारे यांच्याबरोबर एकवटून त्याची स्वतःची फौज तयार केली. आणि सुलेमान राजाच्या साम्राज्यावर हमाला केला. त्यात जींनिचे सगळ्यां  जनजाती एकत्र आल्या पण त्याच्याशक्ती समोर जास्तवेळ टिकू शकल्या  नाहीत ... यात सगळे शहर सोडून गेले. असे म्हणता म्हणता ती गायब होते. आणि प्रिन्स समोर एक राक्षस येतो



प्रिन्स लढायला तयार होतो आणि थोड्याच वेळात त्या राक्षसाला ठार करतो आणि पुढे जाऊ लागतो.




प्रिन्स त्या शहराच्या सिहासन खोलीत येतो.



काय होईल पुढे... ??????

No comments:

Post a Comment