नेमका आजच सकाळी संभाजी नगर मध्ये मामांच्या घरी बॅग ठेवल्या आणि त्याच दिवशी दुपारी तिथं कोरोना पेशंट सापडला , मग काय मामांना आणि ब्यागांना पण घरी आणले उद्या सकाळी घरातूनच बेळगाव चा प्रवास करायचा तसे ड्राइवर ला मामांनी फोन करून कळवले.
सकाळी पप्पा (अमृताचे) भेटून गेले होते.. संध्याकाळी भाई पण येऊन गेला.
रूपा दिदीचा अमृताला मेसेज आलेला रोहीत बरोबर बोलणार आहे म्हणून , मी वर जाऊन कॉल करत होतो पण काही लागला नाही.
9 जुलै 20120
युगाचा वाढदिवस तिला whatsapp वर शुभेच्छा दिल्या.
रात्री अमृता थोडी भावूक झालेली होणारच आधीच हळवी ती , तिने मला धीर दिला मी तिला धीर दिला आणि त्यात मला कधी झोप लागली कळलेच नाही.
सकाळी उठून अद्वैत कडे पाहिले तो गाढ झोपलेला त्याची पापी घेतली.. नंतर आवरून नाष्टा केला आज उप्पीट केलेले, मोठया मामी , धाकट्या मामी, पप्पू आणि सम्राट पण आलेला.
तोवर ड्राइवर आला, त्याचा चहा नाष्टा झाला आणि आम्ही बाहेर पडत होतो बाहर पडण्या आधी देवाला नमस्कार केला नारळ ठेवला आणि सगळे व्यवस्थित होउदे असे म्हटले, जाण्याआधी अमृताने आणि मम्मीने घट्ट मिठी मारली दोघींच्याही डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या. मी दोघीना काळजी घ्या म्हणून सांगून बाहेर पडलो.
मी, पप्पा, मामा आणि ड्रायव्हर निघालो तवेरा गाडीतून,
थोडे अंतर कापल्यावर कळाले जॅकेट राहिले म्हणून परत ते मागवून घेतले पप्पू आणि सम्राट येऊन जॅकेट देऊन गेले, आणि प्रवास सुरु झाला, कोगणुळी जवळ आम्हाला पोलिसांनी अडवले, सगळे झाल्या नंतर आम्ही बेळगाव एअर पोर्ट वर जाण्यास निघालो वाटेत चहा घेतला आणि थोड्या वेळातच एअरपोर्ट वर पोहचलो. गाडीतच सगळ्यांनी जेवण केले, फ्लॉवर ची भाजी, चपाती, झुणका , वडी आणि दही भात मी तर आडवा हाथच मारला.
ड्रायवर कोल्हापूरला जायला निघाला आणि आम्ही एअरपोर्ट वर जाण्यासाठी निघालो. पप्पांचा पहिला विमान प्रवास, मामांचा बहुदा चौथा असावा आणि माझा दुसरा. एअरपोर्ट च्या सगळ्या चॉकशीतुन बाहेर पडल्यावर निवांत खुर्चीवर प्लेन ची वाट पाहत बसलो. थोडा पाऊस होता त्यामुळे flight कॅन्सल होण्याची भीती होती पण सुदैवाने flight वेळेवर निघाली, विमान प्रवासाचे विडिओ आणि फोटो काढत बेंगळुरू कधी आले ते कळालेच नाही.
एअरपोर्टचिच टॅक्सी बुक करून गेस्ट हाउस वर आलो. रूम्स छानच होत्या, आणि गॅस पण होताच, अमृताला कॉल करून सांगितले , मस्त चहा केला, तोवर रामदूत चे 2 मिस्ड कॉल पडलेले, त्याला कॉल केला आणि कुठे आलोय ते सांगितले आणि अमृता डिटेल मध्ये सांगेल असेपण सांगितले.
रात्री 8 ला जेवण केले आणि झोपलो.. सकाळी लवकर 9:30 ला हॉस्पिटलमध्ये जायचे होते...
No comments:
Post a Comment