Powered By Blogger

Search This Blog

Monday, July 13, 2020

13 जुलै 2020

सकाळी उठून सगळे हॉस्पिटल मध्ये गेलो .. 

डेंटल डॉक्टर यायचे होते, आल्यावर दात cleaning केले. आणि मग मामा आणि पापांची RTGS ची तयारी सुरू झाली, सगळे होईपर्यंत 5:00 वाजले असतील हॉस्पिटलमध्ये आजच भरती व्हायचे होते... 

तडक रिक्षा करून सगळे रूम वर आलो आणि कपडे भरली ब्यागेत  , पप्पाना आणि मामांना जाताना नमस्कार केला आणि मी व मामा त्याच रिक्षा ने परत हॉस्पिटलमध्ये आलो.. तिथे मामांनी admission ची प्रोसेस पूर्ण केली पण त्यासाठी भरपूर पाळावे लागले त्यांना..

अखेर रूम मध्ये आलो, रूम तर छानच होती,   त्याचे pics अमृता, भाई आणि पप्पाना पाठवले. थोड्या वेळात नर्स ब्लड घेऊन गेली, नंतर डॉक्टर येऊन आधी काही सर्जरी झाली आहे का , स्मोकिंग करता का वगैरे वगैरे विचारून गेले... नंतर इकोचे मशीन रूम मध्ये  आणून चेक केले, नंतर युगा आणि रणजित दाजींचा विडिओ कॉल आलेला त्यांनी टेंशन घेऊ नको सगळे ठीक होईल म्हणून धीर दिला... त्यांच्याशी बोलून झाले आणि जेवण केले.. 

फक्त पेशंटलाच जेवण , मामाचा उपवास होता आधी कॉफी मागावलेली , नंतर अमृताचा फोन आला थोडा वेळ बोलून झाले तोवर भाईचा कॉल आला त्याने पण तब्बेतीची चौकशी केली परत अमृताचा कॉल झाला पिल्लुला विडिओ कॉल वर पाहिले खूप छान वाटले  मम्मी आणि अमृता पण होतीच विडिओ कॅलवर...  अमृता आणि अद्वैत दोघे होतेच आणि आहेतच माझ्यासोबत नेहमी.. अमृताने अद्वैत आणि तिचा स्वतःचा फोटो पाकिटात ठेवलेला माझ्या त्यामुळे खूप मस्त वाटले होते..

आमचं बोलणे सुरू होते तोवर नर्स आली XRay काढायचा आहे त्यासाठी खाली गेलो, नंतर आलो आणि मग हेअर कटिंग साठी नेले मग बिपी चेक केले... अमृताचे जेवण झालेले मी ब्लॉग लिहीत होतो... तिचा मेसेज आला झाला काय XRay म्हणून... आता ब्लॉग थांबवून अमृताशी बोलतो...



उद्या हार्ट सर्जरी आहे... सगळे ठीक होईल याची खात्री आहेच दादा आहेतच पाठीशी, डॉक्टर पण तेवढे जिनीयस आहेतच... 

Always Hope For The Best, 👍All Izz Well Rohit👍 

Amruta, Advait , Mummy, Pappa I love you Soooooo much ... 

TAKE CARE ALWAYS


No comments:

Post a Comment