त्याआधी दादा महाराजांच्या फोटो ला नमस्कार केलेला आणि अंगारा आणि अत्तर पण लाउन घेतलेले.. आत फोटो नेण्यास मनाई होती...
आत गेल्यावर एक सर्जन कोल्हापूरचीच निघाली.. ती म्हणाली कोल्हापूर मध्ये डॉ. चंद्रशेखर पाटील असताना इकडे कसे? मी म्हटले त्यांच्याकडेच ट्रीटमेंट सुरू होती त्यांनी जातींदर कुमार सर्जन यांचा रेफरन्स दिलेला पण जातींदर कुमार यांनीच इकडकरा म्हणून सांगितले म्हणून इकडे आलो ते पण lockdown मध्ये...
दातातली कॅप काढून सिस्टर ला दिली.. हळू हळू procedure सुरू झाली... जांघेत injuction घुसवले युरिन साठी की काय ते नाही माहिती ... नंतर उजव्या हाताच्या मनगटात इंजेक्शनदेत होते पण त्यांना नस मिळत नव्हती म्हणून मानेवर काहीतरी करत टाके घालायला एका सर्जन ने सुरुवात केली तो पण मला काहीही न सांगता टाके देतच होता... मग मला गुंगीचे इंजेक्शन देत आहोत असे सांगितले.. यानंतर झोप लागेल... मला कधी झोप लागली कळालेच नाही....
मी किती वेळ operation theater मध्ये होतो मला काहीच माहिती नाही... जेव्हा जाग आली तेव्हा काहीच समाजत नव्हते माझ्या तोंडात नळ्या घातलेल्या... तहाण भरपूर लागलेली ... घसा कोरडा पडलेला.. मी पाणी पाणी म्हणायचा प्रयत्न करत होतो पण नळ्या असल्याने नुसते ओठच हलत होते.. नंतर थोड्या वेळाने कोणीतरी 2..3 थेंब पाणी दिले थोडे बरे वाटले पण तेवढे पाणी पुरेसे नव्हते.. मी पाणी पाणी करत राहिलो पण ते काही पाणी देत नव्हते..
नंतर एकदाची पाईप काढली तेव्हा कुठे जरा छान वाटले.. आणि मग पाणी पिले.. जरा जीवात जीव आला..
पहिला पहिला नुसते liquid खायला देत होते दूध, सूप, ज्युस एवढेच.. थोड्या दिवसांनी पोटातील दोन तारा ओढून काढल्या खूप दुखले... पण तारा निघाल्यावर बरं वाटलं..
रोज सकाळी X-Ray काधत होते.. मध्ये एकदा इको केला..
रोज विडिओ वरून मामा, अमृता, मम्मी बोलणे व्हायचे पण जास्त वेळ नाही..
जे माने जवळ टाके होते त्यातून पाइप काढलेली त्यात इंजेक्शन सोडत होते.. २ दिवसांनी पहिल्यांदा नाष्टा दिला .. इडली होती खाल्यावर जरा जिभेला चव आली... नंतर ज्युस.. दुपारी भात(मीठ नसलेला), पातळ भाजी, आमटी रात्री परत खिचडी सकाळ, दुपार, संध्याकाळ औषधेपण होती.
मध्ये मध्ये सकाळी ब्लड घेत होते. कधी कधी त्यांना नस सापडत नसे त्यामूळे मी त्यांच्यावर (नर्सेस) ओरडत होतो.. असे करत करत 21 जुलै 2020 discharge ची तारीख ठरली..
पण INR रिपोर्ट डॉक्टर ना हवा तसा नसल्याने 21 जुलैला discharge दिला नाही.. परत उद्या सकाळी INR टेस्ट..
22 जुलै उजाडला सकाळी ब्लड घेतले नेहमी प्रमाणे नस सापडली नव्हती त्यामुळे ब्लड घेण्यास वेळ झाला होता.. शेवटी ICU मध्ये डॉक्टर आले.. त्यांनी नर्स कडे रिपोर्ट बद्दल विचाराणा केली .. तर ती म्हणाली अजून आले नाहीत.. मग ते डॉक्टर तिथून बाकीच्या पेशंट ची चौकशी करण्यास गेले. नंतर कधीतरी त्यांना रिपोर्ट मिळाला होता .. तोवर माझा नाष्टा , ज्युस झालेला.
11..11:30 च्या आसपास ज्यांनी सर्जरी केली ते स्वतः डॉ. पि. व्ही. राव आले.. त्यांना मी हाथ जोडून नमस्कार केला.. त्यांनी औषधांबद्दल सांगितले.. कोल्हापूरचा पेशंट म्हणून त्यांच्या लक्षात होतेच त्यांनी विनीत कुमार यांना पण माहिती दिली असल्याचे सांगितले. त्यांना कोल्हापूर ला येऊन जा म्हणून सांगितले, त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि कॉन्टॅक्ट करेन असेही म्हणाले.. आज डिस्चार्ज आहे हे ही सांगितले.. व तीन दिवसांनी INR टेस्ट करायला पण सांगितले..एवढे सांगून ते पुढे निघून गेले...
Discharge नंतर 3 दिवस इथेच बेंगलोर मध्ये कावेरी गेस्ट हाऊस वर राहायचे होते कारण 24 जुलै ला परत ब्लड टेस्ट होती...
मामांच्याकडून कपडे मागवली. 12 वाजता जेवण आले तेथे जेवणानंतरची गोळी पण घेतली. नंतर 1..2 च्या आसपास व्हील चेअर वरून मला बाहेर आणले.. मस्त वाटत होते पुढे मामा दिसले मी हात दाखवला.. लिफ्ट मधून ग्राऊंड फ्लोवर वर आलो आणि समोर भव्य मूर्ती दिसली मी नमस्कार केला आणी पुढे आल्यावर हॉस्पिटल चे exit दिसले... पहिल्यांदा 7..8 दिवसांनी बाहेरचे जग बघत होतो मस्त वाटत होते.. अखेर बाहेर पडलो आणि मी आणि मामा रिक्षा ने कावेरी गेस्ट हाउस कडे निघालो.. मामा आवर्जून रिक्षावाल्याला हळू चालावं म्हणत होते त्याने पण व्यवस्थित रिक्षा आणली , पप्पा पुढेच दारात थांबले होते कसे काय बरे आहे का त्यानी विचारलं मी हो म्हटलं.. आत आलो आणि बेड वर पडुन राहिलो...
एकंदरीत सगळे छानच वाटत होते पण अजून थोडे दिवस राहायचे याची खंत देखील होती... मामांनी भरपुर कष्ट घेतले, धावपळ केली खरंच खूप धन्यवाद मामांचे...
जेवण पप्पा रूम मधेच बनवत होते म्हणे , भाजी मार्केट शोधून काढले होते त्यांनी.. भाज्या आणत व रूम वर तयार करून खात असत.. आता मामा पण , दोघे मिळुन जेवण करत..
विमानाच्या बुकिंग साठी paytm वरून try केलेला पण नेमके त्यादिवशी पेमेंट fail झाले... पैसे तर पप्पांच्या अकाउंट मधून कट झालेले.. त्यामुळे मामांनी दुसर्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन विमानाचे तिकीट book केले.
24 जुलै ला मी आणि मामा हॉस्पिटलमध्ये टेस्ट साठी गेलो.. ब्लड दिले, पैसे refund चे पण काम झाले, दायाटीशियन ची appoint घेतली आणि आहाराबद्दल विचारले.. नंतर सुजाता मॅडम ना मामा भेटले.. त्यांना सगळे व्यवस्थित आहे , कोल्हापूर ला येण्याचे निमंत्रण मामांनी दिले आणि आम्ही बाहेर पडलो, पण रिक्षात बसल्यावर कळाले रिपोर्ट मेल वर पाठवण्यासाठी मेल द्यायचा राहिला..
संध्याकाळी सुजाता मॅडमनी मामांना रिपोर्ट Whatsapp वर पाठवलेला तो नॉर्मल होता.. रिपोर्ट आता 2.. 3 रेंज मधेच ठेवायचा होता..
पप्पानी आधीच गाडी बुक केलेली, उद्या 25 जुलै कोल्हापूर ला जायचे.
जसा 25 जुलै उजाडला आम्ही सगळे आवरून नाष्टा करून बसलो तोवर गाडीपण आली, आम्ही एअरपोर्ट वर पोचायच्या आधी परत एकदा नाश्ता केला आणि एयर पोर्ट वर पोचलो, आम्ही 3 तास आधीच पोचलो होतो, एयर पोर्ट वर मला मामांनी व्हील चेअर उपलब्ध करून दिलेली, शेवटी gate जवळ पोचलो आणि वाट पाहत राहिलो...
अखेर बस आली Airindia ची सगळ्यांना घेऊन विमानाकडे न्यायला. आणि एकदाचे आम्ही सगळे बस मध्ये चढलो आणि बस ने विमानाजवळ सोडले.. बेंगलोर चे kempegauda international airport खुपच भव्य होते... आम्ही विमानात बसलो विमान पण 10.. 15 मिनिटे आधीच सुरू झालेले.. आणि थोड्याच वेळात take off झाले. मस्त वाटत होते .. एकदाचे घरी पोचणार..
कोल्हापूर एअरपोर्ट वर भाई आणि पप्पू आधीच येऊन थांबलेले आम्हाला D Y Patil हॉस्पिटलमध्ये बस मधून जाण्यास सांगितले, भाई आणि पप्पू बस च्या मागून पोचले हॉस्पिटलमध्ये, तिथे कळाले की swab टेस्ट करणार होते, पण मामांच्या ओळखीने ते काय करावे लागले नाही आम्हाला होम कॉरांटाईन करण्यात आलेले.. यामध्ये सम्राट ने पण नगरसेवकाकडून होम कॉरांटाईन चे प्रिंट आणलेले...
नंतर आम्ही घरी पोचलो.. दारात रांगोळी काढून ठेवलेली, वाह! मम्मी आणि अमृताने ओवाळले आणि मी गृहप्रवेश केला एकदाचा.
ही भावना काहीतरी वेगळीच होती बऱ्याच दिवसांनी घरचे सगळे पहायला मिळाले.. अद्वैत ला पाहून तर अंगात आणखीन एनर्जी आल्याचा भास झाला..
एकदाचे हुश्श झाले...
No comments:
Post a Comment