कालच फेसबुकवर मित्राच्या बायकोशी बोलणे झालं.. पहिला ज़रा हासत खेळत बोलत होतो पण नंतर मी एक प्रश्न विचारला... "कसा काय सुरु आहे संसार?" यावर "ठीक" असे उत्तर मिळाले.. मग मी आनखिण एक प्रश्न विचारला "मी लग्न करावे की नको?" उत्तर एकुन मी ज़रा दचकलोच... तिने सरळ सरळ उत्तर दिले "एकटे आहात तेच बरे आहे...!"
आणखिण एका मैत्रीणिशी याच दिवशी बोलणे झाले. तीच तर नुकतच लग्न ठरले आहे आणि तिला तर आता स्वर्ग दोन बोटे उरला आहे. पण जसा लग्नाचा ज्वर उतरेल तेव्हा ती पण जमिनीवर येईल असेच वाटतय मला... ते म्हणतात ना नाव्याचे नऊ दिवस तसेच काहीसे...
दोन वेगवेगळ्या मुली एक विवाहित आणि दूसरी अविवाहित... दोघांच्या मनातले विचारपण खुप वेगळे... आज त्या हिंदी म्हणिचा प्रत्यय आला.."शादी का लड्डू .. जो खाए पछताये जो ना खाए वो भी पछताये"
खरच..!
लग्न करुन त्रास सहन करावा की लग्न करुन त्रास द्यावा?
किंवा
लग्न करुन त्रास द्यावा की लग्न करुन त्रास सहन करावा?
की लग्न न केलेलेच बरे?
असेच डोक्यात विचार येत आहेत...!
रोहित काळे
No comments:
Post a Comment