आज जुन्या वहिची पाने चाळताना अचानक एका कवितेवर लक्ष गेले... ती चक्क मी लिहिलेली... त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या...
ती कविता खाली टाईप केलि आहे...
फ़क्त तुझ्यासाठी..
आतापर्यंत मी जगलो फ़क्त तुझ्यासाठी।
पण आता तु माझ्यासाठी जगशील का?
आतापर्यंत तु मला बोलावलेस। पण आता माझासाठी तु येशील का?
आतापर्यंत मी तुझे सर्व ऐकले। पण आता थोड़े तु माझे ऐकशील का?
मी तुझ्यासाठी सार्या जगाला विसरलो। पण तु माझ्यासाठी एक क्षण जगाला विसरशील का?
आतापर्यंत मी तुझी वाट पाहिली। आज तू माझी वाट पाहशील का?
शेवटी मागने एकच आहे। तु माझ्यासाठी थांबशील का?
-रोहीत काळे 29-12-2006(8:30 PM)
No comments:
Post a Comment