Powered By Blogger

Search This Blog

Sunday, July 22, 2012

22 जुलाई 2012.... द डार्क नाइट राइज़ेस

आज  रविवार  सुट्टीचा दिवस. रात्री  रामचा  वाढदिवस केल्याने झोपन्यासाठी  नेहमीप्रमाने वेळ झालेलाच. म्हणून सकाळी 9:30 ला उठालो.  सगळे आवरले आणि विश्वपंधरीला जात असताना मागुन रामची हाक आली.
तो म्हणाला की  आज त्यानी होटेलला सुट्टी घेतली आहे(त्याचे स्वतःचे हॉटेल आहे ). त्याला कपड़े  घ्यायची  होती. मग त्याला म्हटले मी जाउन येतो मग आपण कपडे आणायाला जाऊ .

पण कधी असे झालेलाच नहीं  की प्लान केले आणि त्याप्रमाणे होइल. आम्ही  अर्जुनची त्याने केलेली नविन होम थीएटर सिस्टिम बघायला गेलो आणि तिथेच 1 वाजला.

संध्याकाळी(रात्री ) द डार्क नाइट राइज़ेसचा  प्लान ठरला. तो पण नेहमीप्रमाणे स्टार्ट चुकवलाच. रामने खाण्यासाठी पावभजी आणि Sandwich  आणलेले. 5 जण होतो . 5 पावभाजीच्या भाजीच्या पिशव्या  त्यावर ताव मारण्यात 1/2 तासाचा movie बुडाला. आता एक भाजीची पिशवी आणि पाव कसा खाल्ला असेल तुम्हीच विचार करा.

 तोवर movie चा शेवट आला. त्यात Batman अनुबॉम्ब गोथम शहराच्या बाहेर विमानातून  टाकत असतो.  बराच वेळ गेला तरी तो बॉम्ब समुद्रात टाकत नाही. तोवर आमचा राम म्हणाला "अरे !! आतातरी टाक नाहीतर भारतात घेऊन येशील "  हा हा हा हा आम्हीतर पडून पडून हसत होतो..

No comments:

Post a Comment