आज झी मराठी "टाईमपास डे" साजरा करत आहे..पहायला विसरुनका "टाईमपास" संध्याकाळी ठीक 7 वाजता...
मला वेड लागले "टाईमपास" चे... ;-) :) :-D
Saturday, September 27, 2014
आज टाईमपास डे
Wednesday, September 24, 2014
पाउस
तिच्यासोबत पाउसात भिजण्याचा...
कधी योगच नाही आला.
तिला खुपदा मी बोलवले भेटायला...
खुपदा भेटलोही...
पण तिच्यासोबत पाउसात भिजण्याचा...
कधी योगच नाही आला.
काय असतो तो पहिला पाउस..
कसा असतो तिचा पाउसातला स्पर्श...
त्या स्पर्शाचा कधी योगच नाही आला...
तिला पाहिले फोटो मधे चिम्ब भिजलेले...
पण सत्यात पहायचा कधी योगच नाही आला...
ती जातिये सोडून...
पण त्या आधी तीला डोळ्यात साठवुण ठेवण्याचा योगच नाही आला... :'(
Tuesday, September 23, 2014
Monday, September 22, 2014
सामाधान
समाधान फ़क्त एवढेच आहे...
त्याच्या नावा आधी तुझ्या हातावर माझ्या नावाची मेहंदी लागली आहे...
समाधान फ़क्त एवढेच आहे...
त्याचे नाव जोडण्या आधी तुझ नाव माझ्याबरोबर जोडले गेले आहे...
समाधान फ़क्त एवढेच आहे...
त्याच्या आधी आपण आपला सुखी संसार उभा केला आहे...
समाधान फ़क्त एवढेच आहे...
त्याच्या आधी आपण मातृ पितृ सुख अनुभवले आहे...
समाधान फ़क्त एवढेच आहे...
आपण प्रेम केले आहे...
आपण प्रेम केले आहे...
वाईट फ़क्त इतकच वाटतय...
ज्यादिवाशी एकत्र आलो त्याच दिवशीच वेगळे होतोय...
रोहित काळे..
23-सप्टेम्बर-2014
Saturday, September 20, 2014
Finding Fanny
आत्ताच finding fanny बघुन आलो..
हल्का फुल्का सिनेमा... सरळ साधी आणि तितकीच मनाला लागणारी गोष्ट.. आपण आपल्या प्रेमासाठी आयुष्यभर थांबतो. आपल्याला कळते की आपण खुप काही गमावले आहे. खरे प्रेम व्यक्त करायला संधीच मिळालेली नसते. मग त्याला त्याचे खरे मित्र त्याचे प्रेम शोधण्यासाठी प्रयत्न करतात. त्याला त्याचे प्रेम शोधताना खुप आडचणी येतात. शेवटी जेव्हा तो त्याच्या प्रेमाला भेटतो तेव्हा खुप वेळ गेलेला असतो. त्याच्या प्रेमाची आन्त्यात्रा निघालेली आसते. त्याचवेळी त्याला कळते की त्याच्या प्रेमाने बर्याच मानसांशी लग्न केलियेत. आणि असेही ऐकू येते की त्याच्या प्रेमाचे जीवन म्हणजे एक रंगीबेरंगी दुनियाच होती. त्याला कळते की त्याचे प्रेम खरे होते.. पण तिच्या प्रेमाची व्याख्या वेगळी होती. शेवटी तो प्रेमासाठी एकनिष्ठ राहिला पण त्याने ज्याच्यावर प्रेम केले ते तर 4-5 लग्न करुन ..रंगीबेरंगी आयुष्य जगुन या जगातून निघून गेले आहे. तो शेवटपर्यंत तिची वाट पाहत होता आणि त्याचे प्रेम मस्त जीवन जगत होते...
आणि या सिनेमातुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की कोणालाही दुसर्याच्या आयुष्याबद्दल काहीही लेणे देणे नसते... स्वतः जीवनाचा आस्वाद घेण्यात सगळे मग्न आसतात...
Friday, September 19, 2014
Ignore = टाळणे
आपण प्रेमात पडतो तेव्हा सगळे जग आपल्यासाठी काहीच नसतं... त्यावेळी आपण जगाचा विचारच करत नाही...फ़क्त राजा आणि राणी हेच एकमेकांचे जग...
पण जेव्हा अस्तित्वाची जाणीव होउ लागते (लग्न ठरते) तेव्हा त्याच जगात राणी आणि राजा दोघे एकमेकांपासून इतके लांब जात राहतात असे की एकमेकांसाठी वेळ नसतो... असे की दोघेही अनोळखी... पूर्वी एकमेकांबरोबर तासंतास गप्पा मारणारे आता 2 मिनिट सुद्धा वेळ काढत नाहित एकमेकांसाठी... वर आणि कारणे काय तर आई जवळ होती... भाऊ जवळ होता... बाबा जवळ होते... बोलायच असतं तेव्हा कसही बोलू शकतो.. पण अश्यावेळि त्याना बोलायचेच नसतं... खरच अश्या वेळी कळत नाही प्रेम महत्वाच.. पैसा महत्वाचा .... की नाती महत्वाची.???
पुढुन उत्तर ऐकायला मिळेल नाती महत्वाची.... पण प्रेम म्हणजेपण एक नातेच आहे ना?? ते का नाही नाते समजुन घेत अशावेळी?? पुढे आयुष्यात ती किंवा तो आपल्याला कधीच भेटू शकणार नाहि हे माहिती असते दोघाना... पण तरी देखिल Ignore करतात...
Ignore =टाळणे
खरच हा शब्द खुप टोचतो मनाला... जी व्यक्ति आपल्यावर प्रेम करत होती तीच व्यक्ति आपल्याला टाळत आहे यापेक्षाही भयानक गोष्ट कुठलीच नाही....
रोहित काळे
Wednesday, September 17, 2014
हे प्रेम की यातना...
कधी वाटे मन का हरवते...
अस लपवुन का मिरवते...
हे प्रेम की यातना....
हे प्रेम की यातना....!!!
नविन जीवनाच माप उलटून मुलगी सासरी जाते....
तिचा वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ दोन्ही बदलणार असते...
नवीन जगात तिला अपल अस एक जग निर्माण करायच असत...
नविन नाती नविन चहरे सगळेच नविन असते...
पण... भूतकाळाच काय??
भुतकाळात केलेले प्रेम म्हणजे एक चुक वाटू लागते....
आणि ती चुक लापवन्यासाठी ती 3 जनांशी खोट बोलायला सूद्धा कमी करत नाही... 3 जन म्हणजे तिचं प्रेम(चुक) , तिच्या जीवनात नवरा म्हणून येणारी व्यक्ति आणि ती स्वतः.
स्वतहाशी खोट बोलून संसार करतात देखिल...
पण त्या दोन व्यक्तिंच काय? जी एक फसलेली आसते आणि जिला फसवले गेलेले असते?
फसवली गेलेली व्यक्ति ही एक मित्र म्हणून राहते ते ही एक असा मित्र जो फ़क्त नावापुरता मित्र बाकी तो तिच्या आयुष्यात असला काय आणि नसला काय? नसलेलाच बरे असेच वाटत असते मनापासून...पण कधी बोलून नाही दाखवणार ... का? कारण तिच्या खुप आठवणी त्याच्याकडे असतात... तीला भीती असते त्या आठवणी नवरा मानलेल्या व्यक्ति समोर येतील याची... ती व्यक्ति जर खरच खुप समजूतदार असेल तर त्या मुलीची चुक कधीच कुणाशि बोलणार नाही पण त्या व्यक्तीला जाणीव झाली की ते प्रेम नव्हते तो त्याच्याशी खेळलेला एक खेळ होता...तर मग ती व्यक्ति कोणते पाउल उचलेल हे सांगाणे कठीणच..
आणि नवरा म्हणून जी व्यक्ति असते त्याला तर स्वर्ग दोन बोट राहिलेला असतो... त्याला वाटत असते की अपण एका सुसंस्कृत मुलीशी लग्न केले आहे...
पण नंतर जर का हे सत्य उघडकीस आले तर ??
तर मात्र ते पूर्वीचे प्रेम(चुक) खुपच महागात पड़ते...
मग यातून मार्ग कसा काढायचा??
रोहित काळे
18 सप्टेम्बर 2014 6:15 AM
Tuesday, September 16, 2014
न्याय हवाय मला .....
अजुन बर्याच प्रश्नाची उत्त्तरे निरुत्तरितच आहेत... त्या प्रश्नाना न्याय मिळणार आहे? की ते प्रश्न एका रद्दीच्या भावात निघणार आहेत? हे येणारा काळच ठरवेल...
मला आपेक्षा आहे की त्या प्रश्नाना न्याय मिळेल ...पण नाही मिळाला तर??
नाही मिळालातर बहुतेक बरीच उथळ पुथळ होण्याची शक्यता वाटत आहे...देवा तुझ्याकडे प्रार्थना करतो... माझ्याकडून असे काहीच घडवून घेउ नकोस ज्यामुळे मला आणि सर्वाना अपमानीत व्हाव लागेल...
17 सप्टेम्बर 2014