Powered By Blogger

Search This Blog

Saturday, September 20, 2014

Finding Fanny

आत्ताच finding fanny बघुन आलो..
हल्का फुल्का सिनेमा... सरळ साधी आणि तितकीच मनाला लागणारी गोष्ट.. आपण आपल्या प्रेमासाठी आयुष्यभर थांबतो. आपल्याला कळते की आपण खुप काही गमावले आहे.  खरे प्रेम व्यक्त करायला संधीच मिळालेली नसते. मग त्याला त्याचे खरे मित्र त्याचे प्रेम शोधण्यासाठी प्रयत्न करतात. त्याला त्याचे प्रेम शोधताना खुप आडचणी येतात. शेवटी जेव्हा तो त्याच्या प्रेमाला भेटतो तेव्हा खुप वेळ गेलेला असतो. त्याच्या प्रेमाची आन्त्यात्रा निघालेली आसते. त्याचवेळी त्याला कळते की त्याच्या प्रेमाने बर्याच मानसांशी लग्न केलियेत. आणि असेही ऐकू येते की त्याच्या प्रेमाचे जीवन म्हणजे एक रंगीबेरंगी दुनियाच होती. त्याला कळते की त्याचे प्रेम खरे होते.. पण तिच्या प्रेमाची व्याख्या वेगळी होती. शेवटी तो प्रेमासाठी एकनिष्ठ राहिला पण त्याने ज्याच्यावर प्रेम केले ते तर 4-5 लग्न करुन ..रंगीबेरंगी आयुष्य जगुन या जगातून निघून गेले आहे. तो शेवटपर्यंत तिची वाट पाहत होता आणि त्याचे प्रेम मस्त जीवन जगत होते...
आणि या सिनेमातुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की कोणालाही दुसर्याच्या आयुष्याबद्दल काहीही लेणे देणे नसते... स्वतः जीवनाचा आस्वाद घेण्यात सगळे मग्न आसतात...

No comments:

Post a Comment