आपण प्रेमात पडतो तेव्हा सगळे जग आपल्यासाठी काहीच नसतं... त्यावेळी आपण जगाचा विचारच करत नाही...फ़क्त राजा आणि राणी हेच एकमेकांचे जग...
पण जेव्हा अस्तित्वाची जाणीव होउ लागते (लग्न ठरते) तेव्हा त्याच जगात राणी आणि राजा दोघे एकमेकांपासून इतके लांब जात राहतात असे की एकमेकांसाठी वेळ नसतो... असे की दोघेही अनोळखी... पूर्वी एकमेकांबरोबर तासंतास गप्पा मारणारे आता 2 मिनिट सुद्धा वेळ काढत नाहित एकमेकांसाठी... वर आणि कारणे काय तर आई जवळ होती... भाऊ जवळ होता... बाबा जवळ होते... बोलायच असतं तेव्हा कसही बोलू शकतो.. पण अश्यावेळि त्याना बोलायचेच नसतं... खरच अश्या वेळी कळत नाही प्रेम महत्वाच.. पैसा महत्वाचा .... की नाती महत्वाची.???
पुढुन उत्तर ऐकायला मिळेल नाती महत्वाची.... पण प्रेम म्हणजेपण एक नातेच आहे ना?? ते का नाही नाते समजुन घेत अशावेळी?? पुढे आयुष्यात ती किंवा तो आपल्याला कधीच भेटू शकणार नाहि हे माहिती असते दोघाना... पण तरी देखिल Ignore करतात...
Ignore =टाळणे
खरच हा शब्द खुप टोचतो मनाला... जी व्यक्ति आपल्यावर प्रेम करत होती तीच व्यक्ति आपल्याला टाळत आहे यापेक्षाही भयानक गोष्ट कुठलीच नाही....
रोहित काळे
No comments:
Post a Comment