Powered By Blogger

Search This Blog

Wednesday, September 17, 2014

हे प्रेम की यातना...

कधी वाटे मन का हरवते...
अस लपवुन का मिरवते...
हे प्रेम की यातना....
हे प्रेम की यातना....!!!

नविन जीवनाच माप उलटून मुलगी सासरी जाते....
तिचा वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ दोन्ही बदलणार असते...
नवीन जगात तिला अपल अस एक जग निर्माण करायच असत...
नविन नाती नविन चहरे सगळेच नविन असते...

पण... भूतकाळाच काय??

भुतकाळात केलेले प्रेम म्हणजे एक चुक वाटू लागते....
आणि ती चुक लापवन्यासाठी ती 3 जनांशी खोट बोलायला सूद्धा कमी करत नाही... 3 जन म्हणजे तिचं प्रेम(चुक) , तिच्या जीवनात नवरा म्हणून येणारी व्यक्ति आणि ती स्वतः.

स्वतहाशी खोट बोलून संसार करतात देखिल...
पण त्या दोन व्यक्तिंच काय? जी एक फसलेली आसते आणि जिला फसवले गेलेले असते?

फसवली गेलेली व्यक्ति ही एक मित्र म्हणून राहते ते ही एक असा मित्र जो फ़क्त नावापुरता मित्र बाकी तो तिच्या आयुष्यात असला काय आणि नसला काय? नसलेलाच बरे असेच वाटत असते मनापासून...पण कधी बोलून नाही दाखवणार ... का? कारण तिच्या खुप आठवणी त्याच्याकडे असतात... तीला भीती असते त्या आठवणी नवरा मानलेल्या व्यक्ति समोर येतील याची... ती व्यक्ति जर खरच खुप समजूतदार असेल तर त्या मुलीची चुक कधीच कुणाशि बोलणार नाही पण त्या व्यक्तीला जाणीव झाली की ते प्रेम नव्हते तो त्याच्याशी खेळलेला एक खेळ होता...तर मग  ती व्यक्ति कोणते पाउल उचलेल हे सांगाणे कठीणच..

आणि नवरा म्हणून जी व्यक्ति असते त्याला तर स्वर्ग दोन बोट राहिलेला असतो... त्याला वाटत असते की अपण एका सुसंस्कृत मुलीशी लग्न केले आहे...

पण नंतर जर का हे सत्य उघडकीस आले तर ??
तर मात्र ते पूर्वीचे प्रेम(चुक) खुपच महागात पड़ते...

मग यातून मार्ग कसा काढायचा??

रोहित काळे
18 सप्टेम्बर 2014 6:15 AM

No comments:

Post a Comment